Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार; म्हणाले...

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार; म्हणाले…

मुंबई | Mumbai

काल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गोरेगाव येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित केले. त्यावेळी ठाकरे यांनी भाजपमध्ये (BJP) निवडणुका घेण्याची हिंमत नाही. हिंमत असेल तर लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात, असे म्हणत आव्हान दिले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे…

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ते म्हणाले की, सध्यातरी भारताच्या संविधानाप्रमाणे एकत्र निवडणुका (Elections) होत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे असं काहीतर बोलत असतात. तसेच उद्धव ठाकरे सर्व पक्षाचे नेते झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र करत ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा पंतप्रधानांनी नारा दिला आहे, त्याला समर्थन द्यावं. मग सर्व निवडणुका एकत्रित घेऊ, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

भीषण अपघात! टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेत चार कर्मचारी ठार

तसेच उद्धव ठाकरेंनी आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, असे म्हटले होते. त्याबद्दल फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जैन आणि उत्तर भारतीयांची आता आठवण येत आहे. त्याप्रमाणेच कोण हिंदुत्ववादी आहे आणि नाही हे जनतेला माहिती आहे. कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असं लिहून उर्दूत कॅलेंडर काढले, हे सर्व जनतेने पाहिले आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या