पीएफआयकडून देशात...; एनआयएच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया

पीएफआयकडून देशात...; एनआयएच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई केली आहे. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे...

ते म्हणाले की, पीएफआयवर कारवाई झाली याचा अर्थ असा आहे, मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे एएनआय, एटीएस तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वी केरळ सरकारनेही (Government of Kerala) पीएफआय या संघटनेवर बंदी टाकण्याची मागणी केली होती.

त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता असून पीएफआयच्या कामाच्या पद्धतीतून देशात अस्वस्थता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते. तसेच हे एक षडयंत्र होते त्यामुळे या सर्व गोष्टी बाहेर येतील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पाटणा (Patna) येथील एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा दावा ईडीने केला आहे. तसेच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट (explosion) घडवून आणण्यासाठी पीएफआयतर्फे घातक शस्त्रे आणि स्फोटके गोळा केली जात होती, असेही ईडीने म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com