'पीएफआय'च्या बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

'पीएफआय'च्या बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई | Mumbai

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) हा एक सायलेंट किलर होता. एक मानवी चेहरा दाखवायचा आणि पाठीमागून कृत्य करायचे. भारतीय गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाली त्यामुळे या संघटनेने मानवी चेहरा निर्माण करून काम सुरू केले होते, म्हणून केंद्राने बंदी घातली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis)यांनी केले आहे...

ते म्हणाले की, पीएफआयविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. देशात गैरकृत्य करण्यासाठी या संघटनेने आर्थिक यंत्रणा (Economic System) तयार केली होती. खूप मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडायची आणि या खात्यांमध्ये कुणाला संशय येऊ नये, यासाठी थोडे पैसे जमा करायचे, असा प्रकार या संघटनेकडून करण्यात येत असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

तसेच पीएफआयवर घातलेल्या बंदीसंदर्भात लवकरच राज्यांना अधिसूचना जारी करण्यात येणार असून यानुसार पीएफआय आणि संबंधित सहा संघटनांवर कारवाई करू, असे फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, 'सिमी' या अतिरेकी संघटनेवर (Terrorist Organization) बंदी घालण्यात आल्यानंतर काही लोकांनी एकत्र येत पीएफआयसारखी संघटना काढली आहे. देशातील लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांच्या (intelligence Agencies) सतर्कतेमुळे देशविघातक तत्वांनी ही नवी पद्धत शोधून काढली आहे. तसेच देशातील उत्तर-पूर्व भागात मशीद तोडल्याच्या खोट्या प्रचारानंतर राज्यात तीव्र आंदोलन आणि तोडफोड करण्यात आली होती. पीएफआयकडून अशाच प्रकारचे कृत्य केले जात होते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com