
मुंबई | Mumbai
नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार (Child Bravery Award) देण्याची भूमिका मांडली होती. तसेच यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे म्हटले होते. त्यावरुन आता राजकीय वाद निर्माण होतांना दिसत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे...
यावेळी फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) धर्माचे रक्षण केले. राष्ट्रधर्म स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हींचे रक्षण त्यांनी केले. धर्मांतरण करा हे त्यांनी कधीच मान्य केले नाही, धर्मांतर न करता हालअपेष्टा सोसत बलिदान दिले ते धर्मवीरच होते' असे म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या (Maharashtra) प्रशासनाला जे इन्फेक्शन झाले होते, ते दूर करण्याचे काम शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारने केले आहे. शासन-प्रशासन आता उत्तम काम करत असून अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्राला वेगाने विकास पथावर नेण्याचे काम आमचे सरकार करेल, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीस यांनी दिली.
तसेच राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्या संदर्भात तपासणी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, निरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख यांच्या सुटकेचा जो आदेश आहे तो आधी पवारांनी वाचून बघावे आणि मग निरेटिव्ह सेट करावा, मग तुमच्या लक्षात येईल कोर्टाने काय म्हटले आहे, असे त्यांनी सांगितले.