'त्या' तिघांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला; फडणवीसांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसराजकीय

मुंबई | Mumbai

शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) आणि भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला.

तसेच देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक असेल, अशा आशयाची टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) कॉंग्रेस (Congress) शिवसेना (Shivsena) या तीन पक्षांनी मिळून २०१९ लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत. यापुढेही संपवू शकणार नाहीत, असे फडणवीसांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण म्हणजे, निराशेचे होते, माझा त्यांना सवाल आहे की, आम्ही एकत्र लढलो आणि जास्त जागेसह निवडून आलो. त्यावेळी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्यावेळी राजीनामा का दिला नाही. त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाही. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता असेही फडणवीस म्हणाले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो वापरून निवडून आला होता. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे द्यायचे असते आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवायचे असते' असा सणसणीत टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com