...तर निवडणुकीत तिकीट मिळणार नाही; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

देवेंद्र फडणवीस (File Photo)
देवेंद्र फडणवीस (File Photo)

नाशिक | Nashik

येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक (BJP State Executive Meeting) आयोजित करण्यात आली असून आज कार्यकारिणीच्या बैठकीचा दुसरा दिवस आहे. या बैठकीला राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस, सुकाणू समिती सदस्य यांच्यासह भाजपचे (BJP) स्थानिक सदस्य उपस्थित आहेत...

देवेंद्र फडणवीस (File Photo)
Turkey Syria Earthquake : भूकंपानंतर तुर्की-सीरियात मृत्यूचे तांडव सुरूच! मृतांचा आकडा २४००० पार

या बैठकीत भाजप सदस्यांना मार्गदर्शन करण्याचे काम वरिष्ठ नेत्यांकडून केले जात असून येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी (Election) प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच कार्यकारिणीच्या बैठकीवेळी भाजपकडून निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या सोशल मीडियावर (Social Media) दररोज पोस्ट नाही, ट्विट नाही तसेच ज्यांना किमान २५००० फॉलोअर्स नाहीत अशांना तिकीट मिळणार नाही. तसेच फारसा जनाधार नसलेल्या आपसारख्या (AAP) पक्षाने पंजाबमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ता मिळवली आहे. भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यामध्ये कमी पडतात. त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियावर दररोज सक्रिय राहण्याची गरज आहे, असे त्यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितले.

देवेंद्र फडणवीस (File Photo)
धक्कादायक! पाचशे रुपयांसाठी जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या

दरम्यान, यासोबतच कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाने (BJP and Shinde Group) राज्यात विधानसभेसाठी (Legislative Assembly) २०० जागा निवडून आणण्याचा निश्चय केला आहे. तसेच लोकसभेसाठी ४५ जागा निवडून आणण्याचा निर्णय देखील भाजपने कार्यकारिणीच्या बैठकीत घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असून शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपकडून केले जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस (File Photo)
Valentine Day : ...आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com