Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीसांचे शिवसेना-भाजप युतीबाबत मोठे विधान; म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांचे शिवसेना-भाजप युतीबाबत मोठे विधान; म्हणाले…

नवी दिल्ली । New Delhi

तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) लवकर होईल. तसेच शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून पुढची लोकसभेची निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि भाजप अशा युतीत लढणार आहोत असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी येथे माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले…

- Advertisement -

यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल बोलतांना ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार करू नका असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कुठेही म्हटलेले नाही. त्या सुनावणीचा (hearing) आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. त्यामुळेच मी म्हणतोय की, आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. तुम्ही विचार करत आहात, त्याआधी विस्तार करू असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, भाजपने (BJP) गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेच्या १६ मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) देखील आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघात आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ १६ मतदारसंघात आहेत. या मतदारसंघासाठी काही केंद्रीय नेते प्रभारी म्हणून देण्यात आले आहेत. बारामती मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांना दिली आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीत येणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

याशिवाय या १६ मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांचा देखील मतदारसंघ होता. मात्र जे लोक आता युतीत आमच्यासोबत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून पुढची लोकसभेची निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि भाजप अशा युतीत लढणार आहोत. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी आमची शक्ती त्यांना खर्ची घालणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

तसेच मंत्रालयाचे सचिवालय झाले असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत आहे. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, माहिती असतानाही जेव्हा राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते, त्यावेळी असे सांगितले जाते. हे अधिकार अर्धन्यायिक प्रकरणाच्या सुनावणी दिले गेले आहेत.

याशिवाय गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना (Secretary) ते अधिकार होते. त्यापूर्वीच्या आमच्या सरकारमध्येही अनेक मंत्र्यांनी सचिवांना ते अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नाही, देशात परंपरा आहे. अर्धन्यायिक प्रकरणाचे सुनावणीचे अधिकार सचिवांना दिले जातात. बाकी कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. सरकार जनतेचे आहे. जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आहे. जनतेचे लोकच मंत्रिमंडळाचे निर्णय घेतील, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या