Corona Vaccination : ६ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांचेही होणार लसीकरण, DCGI कडून 'या' लसीला मान्यता

Corona Vaccination : ६ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांचेही होणार लसीकरण, DCGI कडून 'या' लसीला मान्यता

दिल्ली | Delhi

देशात करोना (corona update) प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आता पुन्हा एकदा करोनाने (covid19) डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने (DGCI) भारत बायोटेकला (Bharat Biotech) ६ ते १२ वर्षे वयोगटातील लोकांसाठी कोवॅक्सिनला (Covaxin) प्रतिबंधित आणीबाणीच्या वापराची परवानगी दिली आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले होते. आता DCGI ने ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सीन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.