Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानवाब मालिकांना दिलासा नाहीच! कोठडीतील मुक्काम वाढला

नवाब मालिकांना दिलासा नाहीच! कोठडीतील मुक्काम वाढला

दिल्ली | Delhi

मनी लाँड्रिंगच्या (Dawood Ibrahim money laundering case) आरोपाखाली राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही.

- Advertisement -

नवाब मलिक यांचा आर्थर रोड कारागृहातील (Arthur Road Prison) मुक्काम वाढला असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत (judicial custody) ४ एप्रिलपर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे. तसेच नवाब मलिक यांना तुरुंगात बेड आणि अथंरूणासोबत एक खुर्ची देण्यास न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.

नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पाठदुखी व इतर व्याधींचा त्रास होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर मलिक यांनी कोर्टाकडे बेड, खुर्चीची मागणी केली होती.

मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने (ED) अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता आधी ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुन्हा कोठडीत वाढ झाली होती आणि २१ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या