नाशिक | Nashik

त्र्यंबक तालुक्याला नैसर्गिक वारसा लाभलेला असून येथील पर्यटनस्थळे यांचा मेळ घातल्यास त्र्यंबकेश्वर तालुका उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकतो.

दरम्यान यासाठी आमदार आमदार हिरामण खोसकर यांनी दावलेश्वर या पर्यटनस्थळी भेट दिली. या भेटीत त्यांनी परिसराची पाहणी करीत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आमदार खोसकर यांनी तालुक्यात असणाऱ्या विविध नैसर्गिक पर्यटन स्थळांचा विकास व्हावा यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. याच अनुषंगाने श्री क्षेत्र दावलेश्वर येथे पाहणी करण्यात आली.

तालुक्यातील काही ठिकाणे विकसित होऊ शकतात. यासाठी येथील ठिकाणांचा आराखडा शॉर्टफिल्म द्वारे मांडण्यात येणार असल्याची माहिती आमदार खोसकर यांनी दिली.