Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशवडिलांच्या मृत्युपश्चात मालमत्तेत मुलीस समान वाटा

वडिलांच्या मृत्युपश्चात मालमत्तेत मुलीस समान वाटा

नवी दिल्ली :

सर्वोच्च न्यायालयाने आज वडिलांच्या मृत्यूपश्चातही मुलीला संपत्तीत समान वाटा मिळणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय मंगळवारी दिला. वडील हयात असतील किंवा नसतील तरी देखील मुलींना वडीलोपार्जित संपत्तीत मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

पितृक संपत्तीच्या वाटणीवरून सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा निर्णय आला. मुले लग्नापर्यंत आपले कर्तव्य बजावतात पण मुली लग्न करून परक्या घरी जाऊनही आपले कर्तव्य पार पाडत असतात, असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायलयाने २००५ च्या वारसाहक्क कायद्याची व्याख्या केली आहे. या कायद्याच्या दुरुस्तीपूर्वीही वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीला वडिलांच्या संपत्तीत मुलांइतकाच हक्क होता. त्यानंतर २९९५ पूर्वी एखाद्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला तर मुलीला संपत्तीत वाटा मिळणार का? हा प्रश्न होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल, असा निर्णय दिला. वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळेल, असे स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या