
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांनी आज पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील ७५ वर्षातील लोकशाही आज संपलेली आहे.
सहा महिन्यांपासून लढाई सुरु होती. आमची मागणी होती की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णया आधी निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये. परंतु आज निवडणुक आयोगाने दिलेला निर्णय हा लोकशाहीला अनुसरून नाही. देशात हुकुमशाहीला सुरुवात झाली आहे.
खरा धनुष्यबाण हा आमच्याच कडे राहणार आहे, बाळासाहेबांचे विचार ही आमच्याच शिवसेनेकडे राहणार आहे. हिम्मत असेल तर निवडणुका घ्याव्यात. केवळ आमदार किंवा खासदार यांच्या संख्येवर पक्ष कुणाचा आहे हे ठरू शकत नाही. शिव सैनिकानो खचून जाऊ नका ,आत्ता विजया शिवाय माघार घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.