दै. 'देशदूत’ आयोजित ‘बागलाण दर्पण पुरस्कार’ सोहळा 8 जानेवारीला

सिनेअभिनेते कुशल बद्रिके यांची खास उपस्थिती
दै. 'देशदूत’ आयोजित ‘बागलाण दर्पण पुरस्कार’ सोहळा 8 जानेवारीला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दै. 'देशदूत' आयोजित व सटाणा (Satana )शहरातील श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या (Shridhartatya Kothavade Mitramandal )वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना गौरविण्यासाठी 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा'( Baglan Darpan Puraskar) रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता सटाणा शहरात आयोजित करण्यात आला आहे.

'देशदूत'ला गेल्या पन्नास वर्षांची उत्तुंग परंपरा असून, नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येकाच्या ‘मनामनातील पानापानात’ या संकल्पनेनुसार वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यासोबत तालुकास्तरावर नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा ‘बागलाण दर्पण’ पुरस्काराच्या निमित्ताने सन 2023 या नवीन वर्षात, नवी आशा नवी दिशा घेऊन, नव्या उमेदीने जनमाणसाशी संवाद साधण्यासाठी, प्रत्येक पिढीसोबत असलेले नाते जपण्यासाठी, सटाणा शहरातील राधाई मंगल कार्यालयात बागलाण दर्पण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

सोहळ्यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते ‘चला हवा येऊ द्या फेम’ कुशल बद्रिके(Kushal Badrike ), तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायिका अमृता खोडके - दहिवेलकर( Amrita Khodake) यांची उपस्थिती रहाणार आहे. समारंभासाठी मुख्य प्रायोजक म्हणून श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळ, तसेच सहप्रायोजक म्हणून नाशिक येथील आय वोक ऑप्टिशीयन व देवळा येथील एसकेडी इंटरनॅशनल स्कूल,गिफ्ट पार्टनर म्हणून येवला येथील कापसे पैठणी यांचा सहभाग आहे.

बागलाण तालुक्यातील शैक्षणिक, व्यापार - उद्योजक, कृषी, सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या कार्यातून वैशिष्टयपूर्ण स्थान निर्माण करणार्‍या व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व जगासमोर यावे या हेतूने आयोजित ‘बागलाण दर्पण पुरस्कार’ सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन देशदूत परिवार व श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com