दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मराठमोळी छाप आणि तरुणाईचा उत्सव अशी ओळख असलेल्या तसेच मुंबई, ठाण्यासारख्या महानगरात राजकीय नेत्यांना वलय मिळवून देणाऱ्या दहीहंडी सणाला( Dahi Handi Festival ) साहसी खेळाचा दर्जा (Adventures game)देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

याशिवाय पुढील वर्षी प्रो कबड्डीच्या ( Pro Kabbaddi )धर्तीवर प्रो दहीहंडीचा ( Pro Dahi Handi )थरार रंगणार असल्याचेही त्यांनी घोषित केले. तसेच शासकीय सेवेतील पाच टक्के आरक्षणात गोविंदांचा समावेश करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

राज्यात विशेषतः दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष गोविंदांची घागर रिकामी होती. आता राज्य सरकारने दहीहंडीवरील निर्बंध शिथिल केल्याने मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी होत होती.

उद्या, शुक्रवारी राज्यभरात दहीहंडी साजरी होत असताना एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन गोविंदा पथकांचा आनंद आणखी द्विगुणीत केला. खो खो खेळाला असलेले नियम दहीहंडीला लागू असतील.

उद्या साजऱ्या होणाऱ्या दहंडी उत्सवासाठी विमा कवच देणे शक्य नसल्याने मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी यावर्षी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य करण्यात येईल. तसेच जखमी गोविंदावर शासकीय अथवा महापलिका रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतील, असे शिंदे यांनी जाहीर केले. मात्र, १८ वर्षाखालील गोविंदाना कोणतीही मदत मिळणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *