'तौत्के'चा सामना करण्यासाठी १०० पेक्षा अधिक 'एनडीआरएफ'च्या टीम तैनात

'तौत्के'चा सामना करण्यासाठी १०० पेक्षा अधिक 'एनडीआरएफ'च्या टीम तैनात

मुंबई | वृत्तसंस्था

तौत्के चक्रीवादळाचे सध्या सावट आहे. लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार असल्याने हे चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याने किनारपट्टीच्या भागात नुकसान होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी १०० पेक्षा अधिक एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत...

या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफने पूर्णपणे तयारी केली असून फटका बसणाऱ्या भागात या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.

एनडीआरएफकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 100 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून 42 पूर्वनियोजन, 26 पथके इतर आणि ३२ पथके ही हवाई वाहतुकीतून नुकसानीपासून वाचविण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. यादरम्यान, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात ठिकठिकाणी ही पथके कार्यरत आहेत.

यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये यातील 10 टीम्स तैनात आहेत. यात 2 टीम गोव्यात, 2 टीम सिंधुदुर्गात, 2 टीम रत्नागिरीत, 4 टीम गुजरातमध्ये सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

यापार्श्वभूमीवर मुंबईतील धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येत असून किनाऱ्याजवळील परिसरात पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी पंप बसवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

15 ते 17 मे दरम्यान कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

गेल्या वर्षी ०३ जून रोजी मुंबई व महाराष्ट्राच्या पश्चिमी किनारपट्टीवर निसर्ग चक्रिवादळाने धडक मारली होती. आता या वर्षी सुमारे पंधरा ते सतरा दिवस आधीच तौक्ते चक्रिवादळ धडकणार आहे.

१२ मे रोजी दुपारी दोन वाजता इन्सॅट या उपग्रहानी पाठवलेल्या छायाचित्रानुसार जवळपास संपूर्ण अरबी समुद्रावर चक्रिय कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे व याचा केंद्र हे केरळच्या पश्चिम समुद्रात असल्याचे सांगण्यात आले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com