Cyclone Yaas: 'तौत्के'नंतर आणखी एका चक्रीवादळाचा धोका

'या' राज्यांमध्ये हाय अलर्ट
Cyclone Yaas: 'तौत्के'नंतर आणखी एका चक्रीवादळाचा धोका

दिल्ली | Delhi

तौत्के चक्रीवादळाने गुजरात, महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोरदार तडाखा दिला. तौत्के चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विनाशाही ओढवला आहे. तौत्के चक्रीवादळाचा कहर संपत नाही तोच भारतीय हवामान खात्याने आणखी एका मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. हवामानतज्ज्ञ या चक्रीवादळाला अत्यंत धोकादायक मानत आहेत.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २३-२४ मे दरम्यान 'यास' चक्रीवादळ बंगालच्या खाडीला धडकण्याची शक्यता आहे. यावेळेस चक्रीवादळाला 'यास' हे नाव ओमानकडून देण्यात आलंय. बंगालच्या उपसागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास ३१ डिग्री सेल्सिअस आहे. सतत हवामान बदल आणि समुद्राच्या तापमानातील वाढीमुळे असे चक्रीवादळ येत असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका अंदमान निकोबार बेटांना, ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसणार आहे. दरम्यानच्या काळात याठिकाणी १४० ते १५० किमी प्रतितास इतक्या वेगानं वारं वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

सध्यातरी हे वादळ भारतापासून लांब आहे. जेव्हा हे वादळ भारतीय हवामानाच्या पट्ट्यात प्रवेश करेल तेव्हा आम्ही आमच्या हवामान बुलेटीनमध्ये याचा समावेश करणार आहोत. सध्यातरी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हे वादळ पुढील आठवड्यात धडकण्याची शक्यता आहे, असे IMD चे चक्रीवादळ टीमच्या प्रमुख सुनिता देवी यांनी सांगितले.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाने तौत्के चक्रीवादळाने गुजरात, महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोरदार तडाखा दिला आहे. आतापर्यत या वादळामुळे ६६ जणांचा मृत्यू झाला असून अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कामगारांची बोट उलटून मोठी दुर्घटना देखील घडली आहे. यामध्ये १४ जणांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. तर १८४ जणांना वाचविण्यात यश आले आहे. तौत्के चक्रीवादळाने महाराष्ट्रातील किनारी भागातील जिल्ह्यांचे मोठे नुकसान केले आहे. घरांवरील छपरे उडून गेली आहेत. जागोजागी झाडे कोसळली आहेत. तसेच अनेक भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून वीजही खंडित झालेली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com