Cyclone Tauktae: नाशिक शहरात वारे व ढगाळ वातावरण

Cyclone Tauktae: नाशिक शहरात वारे व ढगाळ वातावरण

मुंबई:

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं चक्रीवादळ तौक्ते गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. हे वादळ सध्या मुंबईच्या दक्षिणेला ४९० किमी अंतरावर असून, १८ मे रोजी ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या वाऱ्यांचा परिणाम नाशिक जिल्ह्यातही झाला आहे. जिल्ह्यात सकाळपासून वेगाने वारे वाहत आहे. तसेच वातावरणात बदल झाला आहे.

कोकणात तौक्त वादळाचा बसलेला फटका
कोकणात तौक्त वादळाचा बसलेला फटका

तौक्ते चक्रीवादळामुळे ‌नाशिकमधील तापमान कमी झाले आहे. नाशिक शहराचे ३९ अंश सेल्सियसवर पोहचलेले तापमान आता ३४ अंशांवर आले आहे. सकाळपासून जोरदार वारे वाहत आहे. मे महिन्यातील ‌उन्हाची तीव्रता जाणवत नाही.

लक्षद्वीप बेटाजवळ निर्माण झालेल्या तौक्ते समुद्री वादळाचा गोव्यालाही फटका बसला आहे. रात्रभर सोसाट्याचे वारे आणि जोरदार पावसामुळे गोव्याच्या किनारपट्टी भागात मोठी पडझड सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जागोजागी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली आहे.

आता हळहळू हे वाद सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दिशेने पुढे सरकत असून ते थोड्याच ते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी ही व्यापून टाकणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाचा सर्वाधिक फटका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच बसण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com