Tauktae Cyclone चक्रीवादळाचा मुंबईला जबरदस्त तडाखा

नियंत्रण कक्षाची निर्मिती
Tauktae Cyclone चक्रीवादळाचा मुंबईला जबरदस्त तडाखा
नियंत्रण कक्ष

मुंबई:

तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) सध्या मुंबईला जबरदस्त तडाखा दिला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईतील अनेक परिसरात तुफान पाऊस बरसत आहे. वाऱ्याचा वेग (mumbai cyclone) देखील प्रचंड आहे. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी नुकतंच एक ट्विट करत या वादळाच्या तीव्रतेबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती सर्वांच्या भेटीला आणली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या वादळ मुंबई किनारपट्टीलगतच्या समुद्रात असून, तिथे त्याची तीव्रता अधिक वाढली आहे. ज्याचे थेट परिणाम हे शहरातील वातावरणावर दिसून येत आहेत.

नियंत्रण कक्ष
DRDO ची कोरोनावरील औषध लॉन्च
 • रायगड जिल्ह्यातील नुकसान

  रायगड जिल्ह्यातील नुकसान

 • रायगड जिल्ह्यातील नुकसान

  रायगड जिल्ह्यातील नुकसान

 • रायगड जिल्ह्यातील नुकसान

  रायगड जिल्ह्यातील नुकसान

 • रायगड जिल्ह्यातील नुकसान

  रायगड जिल्ह्यातील नुकसान

मुंबईत तौक्ते चक्रीवादळ पोहचले असून वाऱ्याचा वेग ९० ते १०० किमीचा आहे. मुंबईत असलेले वादळी वारे रात्री ८ वाजेपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर पोहचणार आहे. त्यावेळी त्याचा वेग १५५ ते १६५ किमी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा

तोक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.

मुंबईत नियंत्रण कक्ष

मुंबई, ठाणे आणि परिसरातील परिस्थितीबाबतही त्यांनी नियंत्रण कक्ष तसेच पालिका आयुक्तांकडून माहिती घेतली तसेच विशेषतः कोविड रुग्णांना त्यांच्या उपचारात काही अडथळे येणार नाही हे पाहण्याच्याही सूचना दिल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com