Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रCyclone Tauktae नौदलाला 14 जणांचे मृतदेह सापडले, 75 जणांचा शोध सुरु

Cyclone Tauktae नौदलाला 14 जणांचे मृतदेह सापडले, 75 जणांचा शोध सुरु

तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये जाऊन शांत झाले आहे. पण, यापूर्वी मुंबईकडून जाताना या वादळाने खूप हाहाःकार माजवला. या वादळात बुडालेल्या बार्जवरील ओएनजीसीच्या (ONGC) 276 कामगारांपैकी 184 जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. मात्र, बार्ज बुडाल्याने बेपत्ता असलेल्या 89 पैकी 14 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. तौक्तेने आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. आता उर्वरित 75 जणांची शोध मोहिम नौदलाने तीव्र केली आहे.

या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या

- Advertisement -

नौदलाने वाचविलेले 184 जण नुकतेच मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांनी भर समुद्रात चाललेला मृत्यूचा तांडव सांगितला आहे. 11 तास लाईफ जॅकेटवर उधानलेल्या समुद्रात तरंगत होते. नौदलाने बचाव कार्यावेळी या साऱ्यांना वाचविले. पश्चिम नौसेना पथकाचे वाइस एडमिरल एम एस पवार म्हणाले की, ‘मागील चार दशकात आम्ही जितके बचाव कार्य केले, त्यातील हे सर्वात अवघड आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या