निवार चक्रीवादळ आज धडकणार; जाणून घेऊयात चक्रीवादळाविषयी सविस्तर

jalgaon-digital
6 Min Read

नाशिक | सलील परांजपे

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, निवार चक्रीवादळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झाल्याचे सांगितले आहे. निवार चक्रीवादळ आज बुधवारी सायंकाळी तामिळनाडूतील कराईकल आणि पॉण्डिचेरी मधील ममल्लापुरम दरम्यान किनारपट्टीला धडकणार असल्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार असून, २५ते २७ नोव्हेंबर दरम्यान विदर्भ , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे…

या वादळाचा सामना करण्यासाठी तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेशात बचाव दलाची १२०० जवान तैनात करण्यात आली आहेत.

यासोबतच आणखी ८०० जवानांना परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १२ गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर वादळच्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या आधीच काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाणून घेऊयात चक्रीवादळाविषयी

जेव्हा समुद्रात गोलाकार आकारांची हालचाल दिसू लागते आणि वाऱ्याचा वेग ताशी ३९ किमी इतका असतो तेव्हा समुद्री वादळ येत असल्याचे हवामान खात्याच्या लक्षात येते व हा वेग जेव्हा ७४ पर्यंत वाढतो आणि चक्रीवादळ असल्याचे लक्षात येते व त्यास नाव दिले जाते .चक्रीवादळत वाऱ्याचा वेग त्याने केलेल्या विध्वंसाचे मुख्य कारण ठरते या वाऱ्यात असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडतो त्यामुळे पूरही येऊ शकतो .

चक्रीवादळांना जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येते हिंदी महासागरात तयार होणाऱ्या वादळांना इंग्रजीत सायक्लॉन , वेस्ट इंडिज बेटे आणि अटलांटिक महासागरात तयार होणाऱ्या वादळांना हरिकेन तर चीनच्या समुद्र आणित पॅसिफिक महासागरात तयार होणाऱ्या वादळांना टायफून असे संबोधण्यात येते. ऑस्ट्रेलियात या वादळांना विली -विलीस असे म्हटले जाते . जेव्हा वादळ जमिनीवर तयार होते तेव्हा त्याला टोरनॅडो असे म्हणतात.

असे केले जाते चक्रीवादळाचे नामकरण

१०० वर्षांच्या सुरुवातीपासून अटलांटिक मधील वादळांना नावे दिली जातात. १९५० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने सर्वप्रथम अटलांटिक महासागरातील वादळांना नावे देण्याची योजना सुरु केली.

यावेळी इंग्रजी अल्फाबेट्सनुसार नावे दिली जात असत. उदा एबल , बेकर , चार्ली इत्यादी. रोमन कॅथेलिक कॅलेंडर वरील संतांच्या नावांवरून वादळाचे नाव देण्याची सुरुवात कॅरेबिअन बेटांवरच्या नागरिकांनी केली.

वादळाच्या दिवशी कॅलेंडरवर ज्या संतांचं नाव असेल ते नाव वादळाला दिले जाई . दुसऱ्या विश्व युद्धांपर्यंत वादळांना अशा प्रकारे नावे दिली जायची पण त्यानंतर हवामान विभागांनी वादळांना महिलांची नावे देण्यास सुरुवात केली.

१९५३ मध्ये अमेरिकन हवामान विभागाने A-W मधल्या महिलांच्या नावांची यादी तयार केली. या यादीत Q U X Y आणि Z ही नावे वगळण्यात आली . या यादीतून अमेरिकेचं हवामान खाते वादळांना नाव द्यायचे.

वादळांना महिलांची नाव देण्यात आल्यामुळे अमेरिकेत ६०-७० च्या दशकामध्ये आंदोलने करण्यात आली . यानंतर १९७८ मध्ये वादळांना पुरुषांची नावे देण्यास सुरुवात झाली. वर्षाच्या पहिल्या वादळाला A अक्षरापासून तर दुसऱ्या वादळाला B अक्षरापासून सुरु होणारं नाव देण्यात यायचं. समअंकी वर्ष आणि विषम अंकी वादळाला पुरुषाचं नाव आणि विषम अंकी आणि सम अंकी वादळाला महिलेचं नाव देण्याची पद्धत सुरु झाली.

१९७९ मध्ये स्त्री व पुरुष दोघांचीही नावे देण्याचा निर्णय झाला तसेच फुले , प्राणी , पक्षी , झाडे , अन्नपदार्थ यांचीही नावे दिली गेली.

आशियातील वादळांना वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि युनाइटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिक यांनी साल २००० पासून नावे देण्यास सुरुवात केली.

नागरिकांना हवामानाचा अंदाज आणि इशारा समजावा तसेच हवामान खाते आणि सामान्य नागरिकांमध्ये सोप्या पद्धतीने संवाद व्हावा यासाठी वादळांना नावे देण्याची पद्धत सुरु झाली.

जगभरात वादळांची नावे उत्तर अटलांटिक ,पूर्वोत्तर पॅसिफिक , मध्य -उत्तर पॅसिफिक, पश्चिम उत्तर पॅसिफिक , उत्तर हिंदी महासागर, दक्षिण -पश्चिम हिंदी महासागर , ऑस्ट्रेलिया दक्षिण पॅसिफिक आणि दक्षिण अटलांटिक अशा ९ भागांमधून ठरवली जातात.

भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत , बांगलादेश , पाकिस्तान , मालदीव , ओमान , श्रीलंका , थायलंड आणि म्यानमार या राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. हे देश प्रत्येकी ८ नावे अशी एकूण ६४ नावे देतात.

चक्रीवादळाचा धोका ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सगळे देश एकत्र येऊन वादळाच्या नावांची एक यादी तयार करतात . २००४ मध्ये ६४ नावांची यादी तयार केलेली होती . नुकत्याच येऊन गेलेल्या ‘आम्प्हान’ चक्रीवादळाला यादीत अखेरचे नाव दिले आहे .

एप्रिल २०२० मध्ये IMD म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने १६९ नावे जाहीर केली आहेत. ज्यामध्ये १३ देशांमधून १३ नावे झाली आहेत . २०१८ मध्ये ८ देशांमध्ये अजून इराण , कतार , सौदी अरेबिया , युनायटेड अरब अमिरेट्स आणि येमेन हे ५ देश सामील झाले आहेत.

यात भारताने गती , तेज, मुरासू , आग यासारखी १३ नावे सुचवली आहेत. बांग्लादेशनेही निसर्ग , निपार, जौरा, अरनाव यासारखी १३ नावे सुचवली आहेत. अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिले नाव ‘ निसर्ग’ असे आहे. हे नाव बांग्लादेशने सुचवले आहे.

जी वादळे खूपच नुकसानकारक ठरतात, निसर्गाची आणि मनुष्याची हानी करतात . त्या वादळांची नावे यादीतून पुढील १० वर्षे बाद केली जातात.

उदाहरणार्थ २००५ मध्ये अमेरिकेत ‘कतरीना’ वादळ आले आणि त्याने भयंकर नुकसान केले . त्यामुळे हे नाव परत वादळाला दिले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *