
दिल्ली | Delhi
अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ सध्या कॉक्स बाजारच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 700 किमी अंतरावर आहे. गेल्या 6 तासात हे चक्रीवादळ 10 किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे हळूहळू सरकत आहे.
हे वादळ आज दुपारच्या सुमारास कॉक्स बाजार (बांग्लादेश) आणि क्यवप्यूमधील (म्यानमार) किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर धडकेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये मोचा चक्रीवादळासाठी लोकांना सतर्क करण्यात येत आहे. स्थानिक लोकांच्या सुरक्षेसाठी दक्षिण 24 परगणना येथील बक्खाली बीचवर नागरी संरक्षण दल तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, नागरी संरक्षण दल सतत लोकांना सतर्क करत आहेत आणि पर्यटकांना समुद्राजवळ जाण्यापासून रोखत आहेत.
सुरक्षा दलांकडून सांगण्यात येत आहे की सध्या परिस्थिती चांगली नसूव आम्ही लोकांना आणि पर्यटकांना समुद्राजवळ न जाण्यासाठी सतत सावध करत आहोत. यापूर्वी पश्चिम बंगालच्या दिघामध्ये मोचा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होती. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) आठ पथके आणि 800 बचाव कर्मचारी तैनात केले आहेत.
आम्ही आठ पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफचे 200 बचाव कर्मचारी मैदानावर तैनात करण्यात आले आहेत, तर 100 जवानांना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे, असल्याचे एका एनडीआरएफ अधिकाऱ्याने सांगितले.