Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिर्डीला जाणाऱ्या सायकलस्वारांना कारची जोरदार धडक; दोन जागीच ठार

शिर्डीला जाणाऱ्या सायकलस्वारांना कारची जोरदार धडक; दोन जागीच ठार

पाथरे | वार्ताहर | Pathare

सिन्नर (Sinner) येथील लोंढे गल्लीतील पाच मित्र सायकल वरून शिर्डीस जात असताना पाथरे शिवारात पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा कारने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन सायकल स्वार किरकोळ जखमी झाले आहेत…

- Advertisement -

आदित्य महेंद्र मिठे व कृष्णा संतोष गोळेसर असे मृत व्यक्तींची नावे आहेत. पाचही सायकल स्वार रस्त्याच्या डाव्या बाजूने एका मागे एक असे चालत असताना मुंबई विरारहून शिर्डीकडे जाणाऱ्या महिंद्रा कारने (एमएच ४८ एके ६२८६) मागील दोन सायकल स्वरांना जोरदार धडक दिली त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.

धडकेचा आवाज ऐकून रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या युवकांनी पांगरी येथील रुग्णवाहिकेला पाचरण करून मृतांसह जखमी सायकल स्वरांना सिन्नर येथे पाठवून दिले. कारमधील किरकोळ जखमी प्रवासी मुंबईचे असल्याने त्यांनी मुंबईतच उपचार घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना मुंबईला पाठवण्यात आले.

घटस्फोटानंतर समांथा, नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र?

पाथरे शिवारातील रस्त्यालगत वास्तव्य असलेल्या गणेश रोडे जगदीश जोर्वेकर सचिन चिने, सुनील चिने, संजय गायकर, कैलास एरंडे, तेजस चिने आदींनी रुग्णवाहिका बोलावून मृतांना गाडीत ठेवले, पलटी झालेल्या कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

- Advertisment -

ताज्या बातम्या