Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याटीम इंडियाची अंतिम फेरीत धडक; अटीतटीच्या लढतीत इंग्लंडचा पराभव

टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक; अटीतटीच्या लढतीत इंग्लंडचा पराभव

नवी दिल्ली । New Delhi

भारतीय महिला संघाने (Indian Women’s team) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला आहे. १९९८ नंतर राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारताने पदक (medel) पक्के केले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर (England) ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून हा टप्पा गाठला असून भारताचे किमान पदकही यावेळी निश्चित झाले आहे…

- Advertisement -

भारतीय संघाने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला २० षटकांमध्ये सहा बाद १६० धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने इंग्लंडच्या फलंदाजांना माघारी पाठवले. इंग्लंडच्यावतीने कर्णधार ताली स्कायव्हरने (Natalie Sciver) सर्वाधिक ४१ धावा केल्या. भारतीय गोलंदाज स्नेह राणाने (Sneh Rana) दोन तर दिप्ती शर्माने (Dipti Sharma) एक गडी बाद केला. तर इंग्लंडचे तीन फलंदाज धावबाद झाले.

या सामन्यात सर्वप्रथम भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि शफाली वर्माने (Shafali Verma) भारताला दमदार सुरुवात करुन देत अर्धशतक झळकावले. दोघींनी पहिल्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. या सामन्यात स्मृतीने ३१ चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने २० तर दिप्ती शर्माने २२ धावा केल्या. तर स्मृतीने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

दरम्यान, १६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडच्या कोणत्याच खेळाडूंना धावपट्टीवर टिकून खेळता आले नाही. सतत विकेट्स पडत असल्यामुळे त्यांना २० षटकात १६५ धावा करता आल्या नाही. तसेच उपांत्य फेरीतील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीतील दुसरा संघही आजच निश्चित होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या