Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याचा आरबीआयचा सल्ला

पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याचा आरबीआयचा सल्ला

नवी दिल्ली :

देशात पेट्रोल-डिझेलचे दर आता शंभरीकडे जात आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी कर कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर घटवण्याचा सल्ला केंद्र व राज्य सरकारला दिला आहे.

- Advertisement -

आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीच्या मिनट्समध्ये शक्तीकांता दास यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला इनडायरेक्ट टॅक्समध्ये कपात करण्यासाठी आवाहन केले आहे. टॅक्समध्ये कपात केल्यानंतर इंधनांच्या दरात देखील घसरण होईल असे देखील ते म्हणाले. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या इनडायरेक्ट टॅक्समुळे आवश्यक वस्तूंवरील दर वाढले आहेत. ज्यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि आरोग्य सेवेचा देखील समावेश आहे. दरम्यान पेट्रोलचे दर वाढल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास देखील महागला आहे.

यापुर्वी अर्थमंत्री निर्मला सितारमण, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही कर कमी करण्याचा सल्ला दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या