Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto Gallery : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड

Photo Gallery : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटल्याने यंदा बाजारात दिवाळी ( Diwali Festival-2022 )निमीत्त प्रचंड उत्साह संचारला आहे. हातात आलेला बोनस, त्यातच नोव्हेंबरचा मिळालेला पगार व शनिवार सुट्टीचे औचित्य साधत आज दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी उसळली.

- Advertisement -

आकर्षक आकाशकंदील, पणत्या, रांगोळी साहित्याने बाजारात नवचैतन्य पसरले आहे दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या यासह विविध प्रकारच्या लाईट्स आणि दिव्यांच्या माळा सध्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाल्या आहे.आजचा ग्राहकांचा उत्साह पाहता यंदाची दिवाळी दोन वर्षाची कसर भरुन काढेल, असा विश्‍वास विक्रेत्यांना वाटु लागला आहे.आज धनोत्रय्दशीच्या निमीत्ताने सराफ बाजारतही मोठी उलाढाल झाली. नव्या कपड्यासह दिवाळ भेट वस्तुंच्या व मिठायांच्या दुकानावर सर्वाधिक गर्दी होती.

दिवाळीचा आज दुसरा दिवस होता. अजुन चार दिवस दिवाळी आहे.शाळांना, कामगार वर्गाला सुट्‌ट्या लागल्या.त्यातच शनिवार रविवारची सुटी सराकरी कर्मचार्‍यांंना जोडुन आली. त्यामुळे आज शालीमार,मेनरोड, शिवाजीरोड, सराफ बाजार,येथे जनसागर उलटल्याचे चित्र दिसले. दुकानदारांनी सकाळी लवकरच दुकाने उघडली. रेडिमेड कपडे, लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानात अधिक गर्दी झाली होती. आज पाऊस थांबल्याने व्यत्यय आला नाही. त्यामुळे व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले.

दहीपूल परिसरात कपडे, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वस्तू खरेदीसाठी, तर कानडे मारुती लेनमध्ये घराची सजावटीसाठी वस्तू खरेदीसाठी गर्दी होती. गर्दीतून दुचाकी, तीनचाकी वाहने येत असल्यानेे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे पोलसानी काही रस्ते वाहतुकीस बंद केले होते. मोठा बंदोबस्त तैनात केला होता. गर्दीचा फायदा घेत चोरटे हातची सफाई करुन पाहत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या