त्रंबकेश्वर मंदिर परिसरातील सोमवारसाठीची संचारबंदी संपणार

श्रावण मास सांगता
त्र्यंबकेश्वर मंदीर
त्र्यंबकेश्वर मंदीर

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

पवित्र श्रावणमासाची( Shravan Month ) आज शेवटच्या सोमवारी सांगता होत आहे सोमवती अमावस्या हा पर्वकाळ आज आहे. त्रंबकेश्वर मंदिर ( Trimbakeshwar Temple Area )परिसारात श्रावण मासासाठी असलेली प्रत्येक सोमवार साठीची लावण्यात संचारबंदी सोमवारी रात्री संपणार आहे.

त्र्यंबकेश्वर नगरीच्या उत्पत्तीपासून तर आज पर्यंत पहिल्यांदाच मंदिर भागात अशी संचारबंदी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आली होती. अनेक ठिकाणी महिनाभर असलेले उपावास विशेष शिवपूजन यांची आज सांगता होईल लक्षावधी भाविक या वर्षी प्रदक्षिणेस मुकले आहेत.

या आठवड्यात श्रावण सरांनीही त्र्यंबकला समाधान कारक हजेरी लावली. त्यामुळे एका अर्थाने श्रावण महिना सर्वांना सुसह्य ठरला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com