नंदुरबारात लग्न समारंभावर धडक कारवाई, तीन जणांवर गुन्हे

लग्न समारंभात जमवली मोठी गर्दी
नंदुरबारात लग्न समारंभावर धडक कारवाई, तीन जणांवर गुन्हे

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

नंदुरबार शहरात लग्न समारंभ व बँड पथकासह ५० व्यक्ती परवानगी असतांना लग्नात २५० लोकांची गर्दी जमवल्या प्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. त्यात दोन वधु पिता तर एकावर पिता आहे.

नंदुरबार जिल्हयात कोरोना विषाणूचे वाढते संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी संचार बंदी, लॉकडाऊन आदेश लागु केलेले आहेत . या आदेशात त्यांनी तोंडाला मास्क लावणे , रुमालचा वापर करणे , अनावश्यक गर्दी न करणे , लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशनची पुर्व परवानगी घेणे अनिवार्य केलेले आहे .

आज दि .२२ फेब्रुवार रोजी नंदुरबारचे नायब तहसिलदार भिमराव बोरसे,नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोना जगन कोकणी , गोपनीय शाखेचे अंमलदार पोकॉ शैलेंद्र माळी , पोकॉ श्रीकांत पाटील यांच्या पथकाने नंदुरबार शहरात आयोजित लग्न स्थळी दुपारी १ वाजता अचानक भेट दिली असता ,

लग्न समारभाचे आयोजक बबन तुमडु अहिरे रा. संत रोहिदास शिरोमणी रोहिदास चौक , बाहेरपुरा , ता.जि नंदुरबार यांनी बाहेरपुरा या ठिकाणी, जयेश सुदाम कुवंर , रा.रनाळे , ता.जि.नंदुरबार यांनी छत्रपती शिवाजी नाट्य मंदीर या ठिकाणी, शिरीष ताराचंद वारुळे , रा . विरसावकर नगर नंदुरबार , ता.जि.नंदुरबार यांनी विर सावरकर नगर येथे राहत्या घरी अशा ठिकाणी होणारे लग्न समारंभासाठी बँड पथकासह ५० व्यक्ती हजर राहणार आहे.

याबाबत पोलीस प्रशासनाकडुन परवानगी घेतली होती . परंतु वरील तिन्ही ठिकाणी असलेल्या लग्न समारंभाचे आयोजकांनी आयोजित लग्न समारंभात २०० ते २५० लोकांची गर्दी जमवून तोंडाला मास्क अथवा रुमाल न वापरता लग्न समारंभात एकत्र जमले होते.

व त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे व त्यांनी पोलीस प्रशासनाकडून घेतलेल्या परवानगीचे उल्लघंन करुन कोरोना विषाणु ची साथ परसरण्यास वाव मिळेल अशी बाधक कृती केल्याने नायब तहसिलदार भिमराव बोरसे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात बबन तुमडु अहिरे, जयेश सुदाम कुवंर, शिरीष ताराचंद वारुळे या तिन्ही आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक रविद्र कळमळकर करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com