दिवाळीपुर्वी शेवटचा रविवार : खरेदीला उत्साहाचे उधाण...

दिवाळीपुर्वी शेवटचा रविवार : खरेदीला उत्साहाचे उधाण...

गेल्या वर्षी कोरोनामुळे दिवाळीचा आनंद क्षीण झाला होता. त्याची भरपाई करणारी उत्साह रविवारी नाशिकमध्ये दिसून आला. दिवाळीपुर्वीचा शेवटचा रविवार असल्याने बाजारपेठेत तुडुंब गर्दी झाली.

पणत्यापासून आकाश कंदीलापर्यंत, कपड्यांपासून इलेक्ट्रीक वस्तुपर्यंत, शोभीवंत वस्तूंपासून ते दागिण्यांपर्यंत सर्वच ठिकाणी खरेदीचा उत्साह दिसून आला. दीड वर्षानंतर मोठी खरेदी होत असल्याने व्यापारी वर्गातही आनंद व्यक्त करण्यात आला.

दिवाळी दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. कपडे, फराळाचे पदार्थ, फटाके -पिस्तुल, आकाश कंदिल, गृह सजावट साहित्य, सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी गर्दी झाली आहे.

मेनरोडकडे जाणारे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. रविवार कारंजा, शालिमार, टिळक रोड येथे बॅरीकेट लावले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com