उद्धव ठाकरेंनी मोदींकडे शिफारस केलेले बीड पीक विम्याच मॉडेल काय आहे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘बीड पीक विमा मॉडेल’चा उल्लेख केला. हे मॉडेल फक्त बीड पुरतेच मर्यादीत न ठेवता संपुर्ण राज्यात लागू करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या भेटीत केली. केंद्र सरकारने हे मॉडेल सध्या फक्त बीड पुरतेच लागू केले आहे. काय आहे हे मॉडेल जाणून घ्या यासंदर्भातील माहिती.

पंतप्रधान – मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील बैठक संपली, या विषयांवर झाली चर्चा

नफ्यात मर्यादा व तोट्यात जबाबदारी असे हे मॉडेल आहे. समजा केंद्र, राज्य व शेतकरी या तिन्ही घटकांची मिळून १०० कोटी रुपये जमा झाले आणि पिकांचे नुकसान १५० कोटी रुपये झाले तर अशा परिस्थितीत कंपन्यांनी ११० कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, उर्वरित ४० कोटी नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यावी.

नफा झाल्यास काय?

राज्य व शेतकरी या तिन्ही घटकांची मिळून १०० कोटी रुपये जमा झाले आणि पिकांचे नुकसान २५ कोटींचे झाले तर विमा कंपन्यांना नियोजन, प्रशासनचा मोबदला म्हणून ५ ते १० टक्के रक्कम मिळेल. उर्वरित रक्कम राज्य सरकारला अदा करावी. नंतर हा पैसा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरला जाईल.