मायबाप सरकार आता तुम्हीच आमचे वाली...

खरिप हंगामाच्या पिकांचे अतोनात नुकसान
मायबाप सरकार आता तुम्हीच आमचे वाली...

पिंगळवाडे | संदीप गांगुर्डे Pingalwade

गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Cyclone) हवामानात बदल (Climate Change) झाला अन धो-धो पावसाने सगळीकडेच थैमान घातले. बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) करंजाडी (Karanjadi) व मोसम खोऱ्यातील (Mosam Khore) खरीप पिकांचे अतोनात नुकसान (Crope Damaged dur to heavy rainfall) झाले असून शेतकऱ्यांच्या नजरा सरकार मायबापकडे लागल्या आहेत....

परतीच्या पावसाने तसेच गुलाब चक्रीवादळामुळे सलग दोन दिवस महाराष्ट्रात ठीक ठिकाणी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला. राज्यातील प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला.

अनेक ठिकाणी नदी, नाले भरून निघाले तर काही ठिकाणी नद्यांना पुराचे स्वरूप निर्माण झाले. या पावसामुळे घराचेही नुकसान झाले. (Heavy rain in Baglan taluka)

नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. शेतकरी वर्ग (Farmers in satana) आधीच आर्थिक संकटात सापडला असताना अचानक अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते बळीराजाचे झाले आहे.

याआधीच तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या शेतमालाला बाजारात किंमत नाही. अशातच शेतकऱ्याची भिस्त खरिपाच्या उत्पन्नावर होती. मात्र आता पूर्णपणे आशा धुळीस मिळाली आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून मदतीची अपेक्षा हे शेतकरी करत आहेत. हाताशी आलेल्या खरीप हंगामातील (kharip seasonal crop) पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून यात बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग, तूर, मिरची, इ. पिके पूर्णपणे खराब झाले आहेत.

याबाबत शासन दरबारी दखल घ्यावी व संबंधित विभागांना सूचना द्याव्यात व झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावे व शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात शासनाकडून मदत मिळणे गरजेचे आहे. हीच अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.