Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यावाहन उद्योगांवर ‘चिप’ तुटवड्याचे संकट

वाहन उद्योगांवर ‘चिप’ तुटवड्याचे संकट

सातपूर । रवींद्र केडीया Satpur

करोना आणि टाळेबंदीमुळे fcorona & Lockdown गेल्या वर्षी वाहन उद्योग automotive industry अडचणीत सापडला होता. त्यातून सावरत वाहन उद्योग पुन्हा गती घेत आहे, असे वाटू लागलेले असताना सेमीकंडक्टर (चिप)ची टंचाई semiconductor shortage निर्माण झाल्यानें या उद्योगावर मोठे संकट उभे राहिलेले आहे. एकीकडे मागणी असताना चिपअभावी उत्पादन पुरवणे अशक्य होत आहे.

- Advertisement -

संपूर्ण जग सेमीकंडक्टर म्हणजेच चिपच्या कमतरतेशी झगडत आहे. याचा थेट परिणाम भारतातल्या वाहन आणि गॅझेट उद्योगावर होत आहे. यामुळे मोठ्या उद्योगांपाठोपाठ लघू व मध्यम उद्योग ऐन दिवाळीच्या तोंडावर नव्या संकटाला सामोरे जात आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील सेमीकंडक्टरच्या (चिप) मर्यादित पुरवठ्याने नवा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे. इंंटेल आणि इतर चिप उत्पादकांनी उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष उत्पादन पूर्ण क्षमतेने होईपर्यंत वर्षभर तरी चिप्सच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. सेमीकंडक्टर चिपच्या टंचाईमुळे नवी वाहनांंचे उत्पादन आपोआप मंदावल्याने वाहन उद्योग अडचणीत आले आहे. त्याचा परिणाम छोट्या उत्पादकांवर होऊ लागलेला आहे.

करोना नंतरच्या काळात उद्योग क्षेत्र गतिमान होत असताना लघू मध्यम उद्योगामध्ये चैतन्य संचारले होते. अचानक चिपच्या तुटवड्यामुळे वाहन उत्पादन संथ गतीने होऊ लागलेले आहे. परिणामी लघू, मध्यम उद्योगांवर नवे संकट घोंगावू लागलेले आहे. दिवाळीच्या तोंडावर नव्या संकटाला उद्योग क्षेत्र तोंड देऊ लागलेले आहे.

7.5 अब्ज डॉलर्सचा करार

या संकटातून कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न केले जात आहेत. चिपची कमतरता दूर करण्यासाठी भारत आणि तैवान यांच्यात एक करार होत आहे, जगातल्या 80 टक्के चिप तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये बनवल्या जातात.

या करारांंतर्गत या चिप भारतातच तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचे भारताच्या वाहन उद्योगांतून सकारात्मक परिणाम दिसून येतील. या करारानुसार भारतात सुमारे 55.23 हजार कोटी रुपयाचा( 7.5 अब्ज डॉलर्स) चिपनिर्मिती प्रकल्प सुरू होईल.

टाटा उद्योगसमूह यात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. तैवान आणि भारताच्या करारानुसार ‘फाईव्ह जी डिव्हाइसेस’पासून इलेक्ट्रिक कारपर्यंतच्या चिपचे उत्पादन भारतात करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात चिपच्या आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही.

जुन्या वाहनांना वाढली मागणी

एकीकडे सुरू असलेली जुन्या मोटारी भंगारमध्ये काढण्याची कारवाई आणि दुसरीकडे नवी वाहने बाजारात येण्यास ब्रेक अशा दुष्टचक्रात वाहन उद्योग सापडला आहे.अशा वातावरणात जुन्या मोटारींना मागणी वाढलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या