Sunday, April 28, 2024
Homeनाशिकगुन्हेगार सुधार योजनेचा मुहुर्त हुकला

गुन्हेगार सुधार योजनेचा मुहुर्त हुकला

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस नियमावली नुसार गुन्हयांच्या प्रतिबंधाबरोबरच गुन्हेगारांमध्ये सुधारणा व्हावी या हेतून शहर पोलिसांतर्फे गुन्हेगार सुधार योजना कार्यान्वीत रकण्यात आली आहे. या योजनेतील पहिला मेळावा सोमवारी (दि.21) होणार होत. मात्र बंदोबस्ताचा ताण वाढल्याने या मेळाव्याचा आजचा मुहुर्त हुकला आहे. आता याची पुढील तारीख लवकरच जाहिर केली जाईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे…

- Advertisement -

या योजनेसाठी पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी संकल्पना राबवत पुढाकार घेतला आहे. ज्या गुन्हेगारांना संधी दिल्यास त्यांच्या वर्तवणूकीत सुधारणा होऊ शकते अशा गुन्हेगारांनी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र लिहुन दिल्यास त्यांना सुधारण्यास वाव देवुन समाजातील जबाबदार नागरीक म्हणुन एक संधी या गुन्हेगार सुधार योजने अंतर्गत देण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात रविवारी (दि.20) त्यांनी आदेश काढले होते. शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. व मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे.

तसेच इतर गुन्ह्यांमध्ये कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या काही गुन्हेगार अडकत असतात. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही ते गुन्हेगार होतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांना सुधारण्याची एक संधी मिळावी यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.

याबाबतचा मेळावा सोमवारी (दि.21) सायंकाळी चार वाजता विभाग 1 ते 4 मधील सहायक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात होणार होता मात्र शहरात मराठा मुक मोर्चा, छत्रपती संभाजी महाराज, पालकमंत्री भुजबळ, कृषीमंत्री दादाभुसे हे दाखल झाल्याने बचानक बंदोबस्ताचा ताण वाढला.

यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून येत्या दोन दिवसात याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त दिपक पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या