नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

आयुक्तालय हद्दीत पोलीस ठाण्यावर किंवा इतरत्र कुठेही विनापरवानगी मोर्चा काढल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला.

नाशिक पोलीस आयुक्तालय शहर परिमंडळ 2 च्या वतीने तपासी अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल कौतुक सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस उपायुक्त विजय खरात, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, दीपाली खन्ना यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वपोनी निलेश माईनकर, नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वपोनी सुरज बिजली, अनिल शिंदे, सुभाषचंद्र देशमुख तसेच पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, श्रीकांत निंबाळकर ,सपोनी गणेश शिंदे, संजय बेडवाल, उपनिरीक्षक राकेश शेवाळे आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा शोध लावत कामगिरी करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध गुन्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्या अधिकारी व कर्मचार्यांनी सदर घटनेचा उलगडा कसा झाला याबद्दल चे कथन व्यासपीठावर येऊन केले. अशा प्रकारे कामगिरी करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचा यापुढेही अशाच प्रकारे कौतुक सोहळा करण्यात येणार असल्याचे आयुक्त पांडे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख तर आभार पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांनी केले. दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळात पोलीस व कुटुंबियांकरता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी केले.