करोना लाटेतही नाशकात गुन्ह्यांचा चढता आलेख

करोना लाटेतही नाशकात गुन्ह्यांचा चढता आलेख

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गुन्हे विश्वात crime 2021 हे वर्ष मोठ्या प्रमाणात गाजले. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत करोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप Corona Second Wave असला तरीदेखील या महिन्यात गुन्हेगारी वाढतच राहिली. या संपूर्ण वर्षात शहर कार्यक्षेत्रामध्ये यावर्षी आकडे प्रसिद्ध होईपर्यंत 2,575 गुन्हे नोंदवण्यात आले असून यापैकी 1640 गुन्ह्यांचा तपास लागला आहे.

भूमाफियांना land mafia मोक्का, खुनाच्या प्रकरणात कडक शिक्षा, राजकीय गुन्हे, केंद्रीय मंत्र्यांना अटकेचा आदेश तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी आंदोलन, नो हेल्मेट, नो पेट्रोल, हेल्मेटसाठी समुपदेशन Helmet Awarness , परीक्षा तसेच शहर सुशोभित ठेवण्यासाठी बॅनरचा वापर करण्यापूर्वी लागणारी परवानगी या विविध कारणांनी हे वर्ष गाजले. तर ग्रामीण परिक्षेत्राचा विचार करता रौलेट किंगचा पर्दाफाश, गुटखामाफियांना दंड, इगतपुरी रेव्ह पार्टीवर धाड टाकत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी बॉलिवूडचा चेहरा समोर आणला. एका लॉन्समध्ये अवैधरीत्या बनवण्यात येणार्‍या दारूच्या गुत्त्याचा पर्दाफाश केला.तसेच बनावट नोटांचे नाशिक-सुरगाणा-गुजरात कनेक्शन उघड करून बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करत त्यांना अटक केली.

रौलटचा पर्दाफाश Roulette

रौलेटमाफिया कैलास शहा व त्याच्या साथीदारांविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये दोन व इतर पोलीस ठाण्यांमध्ये पाचहून अधिक गुन्हे दाखल आहेत. रौलेट जुगारात पैसे हरल्याने आणि कर्जबाजारी झाल्याने त्र्यंबकेश्वर येथील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सुरुवातीस युवकांना जुगारात परताव्याचे आमिष दाखवून त्यांना पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित केले जायचे. त्यानंतर पैसे हरल्यास पुन्हा जास्त पैसे गुंतवण्याचा दबाव आणून युवकांना कर्जबाजारीही केल्याचे समोर आले आहे. कैलास शहा व त्याच्या साथीदारांवर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी मोक्का कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप मेढे यांचा मुलगा संदीप मेढे याने शेतजमीन विक्रीतून आलेले 35 लाख रुपये रौलेटमध्ये हरल्याने आणि कैलास शहाच्या त्रास, धमकी आणि दहशतीला कंटाळून आत्महत्या केली होती.

या प्रकरणी दिलीप मेढे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात कैलास शहा, शांताराम पगार आणि सुरेश वाघविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलीस तपासात रौलेट किंग कैलास शहा व त्याच्या साथीदारांचे कारनामे आता पुढे येऊ लागले आहेत. रौलेटच्या माध्यमातून 2 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुग्राम, हरियाणा येथील धन्ना गुलाब सिंह यांनी गुरुग्राम सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

रेव्ह पार्टी उद्ध्वस्त Rave Party

इगतपुरीत मानस रिसॉर्टच्या हद्दीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर रेव्ह पार्टी सुरू असल्याचे पोलिसांना समजले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला होता. छाप्यात सिनेसृष्टीतील कलाकारांना अटक केल्याने पुन्हा सिनेसृष्टी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. पोलिसांनी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या हिना पांचाल हिच्यासह एक विदेशी महिला, मराठी आणि दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या पाच अभिनेत्री, दोन कोरियोग्राफर महिलांसह 22 जणांना बिभत्स अवस्थेत ताब्यात घेतले होते. पोलिसांनी कॅमेरा, ट्रायपॉड, कोकेन ड्रग्ज, हुक्कासह अमली पदार्थ व रोकड जप्त केली होती.

बनावट नोटा चलनात आणणार्‍याविरुद्ध कारवाई

नाशिक ग्रामीण भागात बनावट नोटा चलनात असणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कारवाईचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी सुरगाणा, विंचूर व लासलगाव येथून आठवडे बाजारांंमध्ये बनावट नोटा चलनात आणणार्‍या 14हून अधिक आरोपींना अटक केली.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे 10 लाखांच्या पाचशे व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा, छपाई मशीन जप्त केली आहे. 25 हजार रुपयांच्या बदल्यात एक लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यावेळी येवला रोड विंचूर येथे दोन व्यक्ती बनावट 500 रुपयांच्या काही नोटा देण्यासाठी येत असल्याचे समजले होते. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

यावेळी येथील संशयित मोहन पाटील, प्रतिभा घायाळ, विठ्ठल नावरिया यांना बनावट 500 रुपयांच्या 291 नोटा देण्यासाठी आले होते. त्यांच्याकडील इटीऑस कार (एमएच 3 सीएच 3762) ने आले होते. यावेळी छापा टाकून त्यांच्याकडून 500 रुपये दराच्या बनावट 291 नोटा व इटीऑस कार किंमत अंदाजे 4 लाख रुपये जप्त करण्यात आली आहे. रवींद्र हिरामण राऊत व विनोद मोहनभाई पटेल अशी या दोन्ही संशयितांची नावे आहेत.

जानेवारी

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच अवैध धंद्यांची जबादारी फक्त पोलिसांची नसून इतर खाते देखील त्यास जबाबदार असल्याचे मत अद्यापपर्यंत ठाम ठेवले आहे.

नॉयलॉन मांजा विक्री करणार्‍या दुकानदारांचे शॉप अ‍ॅक्ट लायसन्स रद्द करण्याचा पोलिसांच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे नाशिककरांकडून स्वागत.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी मोक्काची कारवाई

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे लग्नसोहळ्यात पाकीट हरवले की ते लांबवले ?

पेठ तालुक्यातील वांगणी येथे कंटेनरने दिलेल्या धडकेत नाशिक ग्रामीण पोलीस कुमार गायकवाड यांचा जागीच मृत्यू.

मुलाची पित्याकडून हत्या

टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाणला अटक. जामिनावर आला होता बाहेर.

वणीमध्ये बालविवाह उघड

फेब्रुवारी

शहर वाहतुकीला शिस्त लावण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या ट्रॅफिक सिग्नलच्या नियंत्रणाची जबाबदारी पोलीस प्रशासनकडे सोपवण्याचा महापालिकेचा निर्णय

सिव्हिल हॉस्पिटलमधून अपहरण झालेल्या बालिकेची पोलिसांकडून सुखरूप सुटका

करोनामुळे थांबवण्यात आलेले जिल्हा कोर्टाचे कामकाज पहिल्याच आठवड्यात सुरळीत

आनंदवल्लीतील रमेश मंडलीक या वृद्धाची जमिनीच्या वादातून निर्घृण हत्या. या प्रकरणामुळे भूमाफिया कार्यरत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड

15 लाख रुपयांची रोकड लंपास करणार्‍या चौघांना कमी वेळात अटक करण्यात मुंबई नाका पोलिसांना यश मिळाले.

विनायक ऊर्फ झगड्या ऊर्फ दीपक लाटे या पंचवटीतील सराईत आरोपीविरोधात वर्षातील पहिली स्थानबद्धतेची कारवाई

साथीदारांसह लुटीचा प्लॅन आखून तब्बल 15 लाख रुपयांची रोकड लंपास करणार्‍या चौघांचा भंडाफोड

आकाश संतोष रंजवे या युवकाची द्वारका भागातील वडाळा नाका परिसरात असलेल्या महालक्ष्मी चाळीजवळ सिनेस्टाईल हत्या

आंदोलन, मोर्चे, मिरवणुकांना परवानगी आवश्यक. पोलिसांची नियमावली जाहीर

वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्तांचे कार्यालय पोलीस आयुक्तालयात हलले

मार्च

गंगापूररोड-शरणपूर लिंकरोडवरील ठक्करनगरमध्ये दुपारच्या सुमारास बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ; प्रत्यक्षात फटाकडे असल्याचे निष्पन्न

विविध गुन्ह्यांची नावावर नोंद असलेल्या योगेश हिवाळे या सराईत आरोपीने पोलीस अधिकार्‍याचे नाव घेत केली आत्महत्या

पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणार्‍या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये चोरीची घटना; कैलास सोनवणे या पोलीस उपनिरीक्षकास अटक

पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांवर उपचार करण्यासाठी सज्ज करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची दुसर्‍या लाटेसाठी सुरुवात

सात अधिकारी तर 37 पोलिसांना करोना संसर्ग

करोना संसर्ग टाळण्यासाठी तसेच गर्दीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज दोन सत्रात सुरू

करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पोलीस व महापालिकेच्या वतीने शहरातील बाजारपेठांमध्ये प्रवेशासाठी प्रत्येकी पाच रुपयांची पावती बंधनकारक

सामाजिक अंतर न पाळणार्‍या अस्थापनांना एकाच दिवसात एक हजार 765 पावत्यांचे वितरण करत एक लाख 84 हजार 825 रुपयांचा दंड वसूल

महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेणार्‍या 118 व्या तुकडीतील 668 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात

एप्रिल

महापालिकेच्या घरपट्टी-पाणीपट्टी विभागातील संजय पटेल या कनिष्ठ लिपिकाला 10 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

चेनस्नॅचिंग घटनांचे धागेदोर पोलिसांनी उलगडत श्रीरामपूर येथून बेग टोळीच्या अट्टल चेनस्नॅचरला अटक केली. 11 गुन्हे उघडकीस आले.

चेनस्नॅचिंग करणार्‍या आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या संगमनेर येथील दोन मुलांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

करोना बंदोबस्तासाठी पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन प्लाटूनसह होमगार्डस्चा मोठा फौजफाटा तैनात

भरधाव मालट्रकची ओव्हरटेक करणार्‍या दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात सात वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

शहर पोलीस दलातील 18 अधिकारी तर 145 कर्मचार्‍यांना करोनाची बाधा

‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत जिल्हा आणि राज्याच्या बाहेर जाण्यासाठी इ- पास

रेमडिसीव्हर या औषधाच्या पाच बॉटल्स काळ्या बाजारात विक्रीच्या तयारीत असलेल्या मयूर पितांबर सोनवणे यास अटक

मे

महिला, आर्थिकदृष्ट्या मागस आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या नियमानुसार पात्र व्यक्तींना मोफत कायदेशीर सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाने विशेष वकिलांची नियुक्ती करत गरजू पक्षकारांना थेट मोबाईलद्वारे सेवा देण्यास सुरुवात

संभाषण लिक प्रकरणाच्या मुंबई हायकोर्टासह मुंबई सेशन कोर्टात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांची नियुक्ती केली

जमीन वादातून रमेश मंडलीक या वृद्धाची नियोजित पद्धतीने हत्या करणार्‍या टोळीविरोधात राज्यातील पहिला भूमाफिया मोक्क्यास मंजुरी

जमीन कागदपत्रात झालेली खाडाखोड आणि त्यानंतर सातबारा उतार्‍यातील फेरफार या प्रकरणात चौकशी करण्यासाठी शहर पोलिसांनी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना पुन्हा समन्स पाठवले.

प्रादेशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार आरोपांप्रकरणी पोलिसांना तक्रार अर्ज प्राप्त

चौकशीसाठी समिती गठित करण्यात येऊन चौकशी सुरू

प्रादेशिक परिवहन विभागातील गैरव्यवहार आणि अधिकार्‍यांकडून होणार्‍या आर्थिक लुटीचे आरोप करणारे वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील चौकशीसाठी अखेर हजर झाले. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी त्यांच्याकडे सहा तास चौकशी केली.

जून

कंपनीच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम व स्कॉलरशिप मंजूर करून देण्याचे आमिष; भामट्यांनी शहरातील पालकांना सुमारे पावणेतीन लाख रुपयांना गंडा घातला

नाशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहाराची चौकशी प्रक्रिया अखेर पंधरवड्यानंतर संपली. यादरम्यान सुमारे 35 ते 40 अधिकारी व खासगी व्यक्तींची चौकशी पार पडली.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीत कंपनीतील कामगार व बाहेरील संशयितांनी मिळून सुमारे आठ लाख 38 हजार 553 रुपयांचे स्पेअर पार्ट लंपास केले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र येऊन करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसैनिकांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा

सुरगाणा येथील पाचशे रूपयांच्या बनावट नोटांच्या तपासाप्रकरणी गुजरात राज्यातील वलसाड पोलिसांनी 12 पोलिस अधिकार्‍यांचे विशेष पथक नियुक्त

पोलिस ठाण्यामार्फंत आपल्या हद्दीत वाहनावरील स्पीकरच्या मदतीने व्यापार्‍यांना व नागरिकांना सांयकाळी चार वाजता बाजारपेठा बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्यात.

जुलै

बनावट चेकद्वारे तब्बल पाच कोटी रूपये काढून त्याची लागलीच विल्हेवाट लावण्यात आला. या प्रकरणी नाशिकच्या बँक ऑफ बडोद्याच्या शाखेने सर्व पेमेंट थांबवण्याचे आदेश दिले; याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार

पत्नीच्या आत्महत्येनंतर पोलिस कोठडीत जाऊन बसलेल्या प्रकाश निकम या व्यक्तीची आत्महत्या; जायखेडा पोलिस ठाण्यातील घटना

ईडी आयुक्तांच्या नावे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना धमकावण्यात आले.

शहरातील रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्क होणार्‍या वाहनांना हटविण्यासाठी अखेर टोईंग व्हॅन पुन्हा सुरू करण्यात आल्यात.

हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही नियमाबाबत अद्यादेश प्रसिद्ध

ऑगस्ट

नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून बी. जी. शेखर यांची नियुक्त

नाशिक जिल्हा कोर्टाचे काम नियमीत सुरू

पंचवटीतील गणेशवाडीत दोघा सराईतांसह चौघांनी रस्त्यात चार चाकी अडवून सोन्याचे दागिणे ओरबडले त्यानंतर एकावर चाकूचे वार केले.

ङ्गभुमाफियाफ या लघूपटाचे सुरेश वाडकर यांच्या हस्ते प्रदर्शन

एमपीएतील विविध विकास कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव येथील बीएचआर अवसायक जितेंद्र कंडारे याच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांना अनेक महिन्यांपासून चकवा देणार्‍या सुनील झंवर यास अटक

केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे दरवर्षी दिला जाणारा यंदाचा केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांना जाहिर

नो हेल्मेट नो पेट्रोल नियमाची सुरूवात

आठ लाखांची लाचप्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अटकेसाठी भल्यासकाळीच पथक पाठवण्याचे काम शहर पोलिसांनी केले. राज्यात नाशिक पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यभरात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले.

राणे आणि मुख्यमंत्री वादानंतर सेना भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

सप्टेंबर

जिल्हा कोर्टाच्या सात मजली इमारतीच्या कामासाठी दीड वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने 171 कोटी रूपयांच्या कामाची निवीदा प्रसिद्ध केली

21 वर्षांच्या तरूणाने 50 वर्षांच्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना भांडी बाजारातील बालाजी कोटजवळ घडली

प्रशासकीय कारणास्तव गृहमंत्रायलाने अवघ्या वर्षभरात जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांची मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून बदली केली; या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयत जनहित याचिका दाखल

नियमबाह्य पद्धतीने पेट्रोल दिल्यास परवाना रद्द का करू नये, अशा नोटीसा बजावण्यास सुरूवात

ऑनलाईन जुगाराच्या समूळ उच्चाटनासाठी या कायद्याची नव्याने आखणी करावी लागण्याबाबतचा सविस्तर अहवाल पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी विधीमंडळाच्या अंदाज समितीकडे सादर केला

नव्याने बांधण्यात आलेल्या तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर करण्यात आले

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घ्यावी यासाठी धमकावण्यात आल्याप्रकरणी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी शहर पोलिसांकडे तक्रार अर्ज

ऑक्टोबर

पतीच्या निधनानंतर सुजाता प्रवीण तेजाळे आणि अनया प्रविण तेजाळे या मायलेकींची आत्महत्या

कांदे तक्रारप्रकरणी रिपब्लीकन पार्टी इंडियाचे (ए) राज्य पदाधिकारी आकाश निकाळजे यांचा जबाब नोंदवण्यात आला

आयपीएल क्रिकेट बेटींग सुरू असल्याचा आरोप करीत या प्रकरणी गुन्हा दाखल न करणे व क्रिकेट बेटींग सुरू ठेवण्यासाठी तीन लाख रूपयांची लाच स्विकारण्याच्या आरोपाखाली पोलिस उपनिरीक्षकासह त्याच्या साथिदारास अटक

सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदोरी शिवारात एका मंगल कार्यालयात सुरू असलेला देशी दारू तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उद्धवस्त केला. सुमारे एक कोटी रुपयांचा देशी मद्यसाठा व इतर मुद्देमाल जप्त.

हेल्मेट वापराचे प्रमाण वाढवण्यासाठी आता हेल्मेट नाही तर सहकार्य नाही, ही योजना पुढे आणण्यात आली

शहरातील जाहिरात फलकांबाबत पोलिस आयुक्तांची नवी नियमावली जाहिर

नोव्हेंबर

भूमाफिया टोळीचा मास्टरमाइंड रम्मी राजपूतसह त्याच्या भावास अटक

नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचा जबाब नोंदवण्यात आला.

मैत्रणींसोबत महागड्या हॉटेल्सला फिरणे, मौजमजा, महागडी जीवनशैली यामुळे सिव्हिल इंजिनीअर असलेल्या तरूणाने एकट्याने 36 चेन स्नॅचिंग केल्याची बाब समोर आली. या तरूणासह त्याच्या साथिदारांना गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

नाशिकहून प्रवाशी घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसवर सिन्नर बायपास रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली.

हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या नोटीसीला उत्तर द्या, सुनावणीअंती पोलिसांची कारवाई चुकीची वाटत असेल तर कोर्टात दाद मागा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाचे न्यायमुर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमुर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने दिले

अखिल भारतीय महिला विकास परिषदेने राष्ट्रीय पातळीवरील दोन दिवसीय महिला वकीलांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले

भारतीय जनता पक्षाच्या सातपूर विभागाच्या मंडल अध्यक्षाची हत्या करण्यात आली

डिसेंबर

कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केल्यापासून आपल्याला धमकावण्यात येत असून, जीवाला धोका निर्माण झाल्याची तक्रार माजी मंत्री मधुकर पिचड यांची सुन राजश्री किरण देशमुख यांनी मुख्यमंत्र्याकडे केली

हेल्मेट न वापरणार्‍या दुचाकीस्वारांची दोन तासांची लेखी परिक्षा घेण्यास सुरूवात

जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत 16 हजार 679 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून 44 कोटी 76 लाख 52 हजार 449 रुपयांचे तडजोड शुल्क, नुकसान भरपाई वसूल करण्यात आली

रविवार कारंजासह निमाणी येथील सर्कलवर ट्रायल रन.

Related Stories

No stories found.