Breaking # जून्या वादातून रामेश्वर कॉलनीत तरुणांवर चॉपर हल्ला

एकाची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात उपचार सुरु
Breaking # जून्या वादातून रामेश्वर कॉलनीत तरुणांवर चॉपर हल्ला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जून्या वादातून (old debate)रामेश्वर कॉलनीतील (Rameshwar Colony) दोन तरुणांवर (two youths) चॉपर हल्ला (Chopper attack) झाल्याची घटना रविवारी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये नितीन निंबा राठोड (वय-24) व सचिन कैलास चव्हाण (वय-22) दोघ गंभीर जखमी झाले. यातील नितीन राठोड याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुगणालयात (private hospital) उपचार (Treatment) सुरु आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनीत नितीन राठोड व सचिन चव्हाण हे वास्तव्यास आहे. लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मेहरुण परिसरातील तुषार सोनवणे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्या वादाचे अनेकदा पडसाद उमटले आहे. दरम्यान, या वादाच्या कारणावरुन रविवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास नितीन हा घराबाहेर उभा असतांना तुषार सोनवणे हा कारमध्ये काही तरुणांसोबत आला.

त्याने नितीनला जवळ बोलावून घेत त्याच्यावर चॉपरसारख्या शस्त्राने वार केले. दरम्यान, नितीनवर वार होत असल्याचे समजताच त्याचा आतेभाऊ सचिन हा त्याठिकाणी आला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील वार करुन जखमी करीत हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

एकाची प्रकृती चिंताजनक

टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात नितीन राठोड हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com