क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ

मुंबई | Mumbai

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Elections) १८२ जागांपैकी ८९ जागांवर आज पहिल्या टप्प्याचे मतदान (Voting) सुरू झाले असून या मतदानाच्या काही तासांपूर्वी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे...

बाळासाहेब ठाकरे यांचा हा जुना व्हिडीओ असून त्यात बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे गुणगान गाताना दिसत आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे, नरेंद्र मोदी नाहीत तर गुजरात काहीच नाही, असे बाळासाहेब या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. अवघ्या १९ सेकंदाचा हा व्हिडीओ असून तीन तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला (Video) ४.९ लाख व्ह्यूज मिळाले असून ४३.४ हजार लाईक्स आहेत. याशिवाय १.४ हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या असून हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा (Rewaba Jadeja) उत्तर जामनगर विधानसभा (North Jamnagar Assembly) मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना तिकीट दिले आहे. याआधी २०१७ साली उत्तर जामनगर मधून निवडून आलेले भाजपचे धर्मेंद्र सिंग जडेचा यांना पक्षाने तिकीट नाकारत रिवाबा यांना संधी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com