Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याकोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन आता मेडिकलमध्येही मिळणार

कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन आता मेडिकलमध्येही मिळणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

करोनावर रामबाण ठरलेल्या कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही करोना प्रतिबंधक लसी आता मेडिकलमध्येही उपलब्ध होणार आहेत….(covishield and covaxin vaccine will be available at medical stores earliest)

- Advertisement -

यामुळे इतर इंजक्शनसारख्या या लसी टोचणे शक्य होणार आहे. लसींची किंमत प्रतिडोस २७५ रुपये ते ४५० रुपयांपर्यंत असू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नियमित वितरणाची परवानगी द्यावी यासाठी भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि सीरम इन्स्टिट्यूटकडून (serum institute) या लसी मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.

दोन्ही कंपन्यांची ही मागणी लवकरच मान्य केली जाणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही लसी मेडिकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या