Corona Update : भारतात दैनंदिन रुग्णांसह मृतांच्या संख्येतही घट, मात्र...

लसीकरणाच्या कार्यक्रमाने ७३ कोटींचा टप्पा ओलांडला
Corona Update : भारतात दैनंदिन रुग्णांसह मृतांच्या संख्येतही घट, मात्र...

दिल्ली | Delhi

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. करोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे. मात्र केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. गेल्या २४ तासात देशात वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद ही केरळमध्ये झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत देशामध्ये ३३ हजार ३७६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या ३ लाख ९१ हजार ५१६ झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३२ लाख ०८ हजार ३३० इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ३२ हजार १९८ जणांनी करोनावर मात केली असून ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २३ लाख ७४ हजार ४९७ जणांनी करोनावर मात केली असून ४ लाख ४२ हजार ३१७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. गेल्या २४ तासात वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद ही केरळमध्ये झाली आहे. काल एकाच दिवसात केरळमध्ये २५ हजार १० नवीन रुग्णांची भर पडली तर १७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरणाच्या कार्यक्रमाने ७३ कोटींचा टप्पा ओलांडला

भारतात सुरु असलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलाच वेग घेतला असून ७३ कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील ५५.५८ कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस आणि १७.३८ कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशातील १८ टक्के नागरिकांना करोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com