पहिली ते नववी, अकरावी वर्ग आजपासून बंद

दहावी, बारावी वगळले, कोचिंग क्लासेसवरही निर्बंध, ऑनलाईन अध्यापन सुरूच राहणार
पहिली ते नववी, अकरावी वर्ग आजपासून बंद

मुंबई (प्रतिनिधी)-

करोना संसर्गाने पुन्हा उसळी घेतली असून बाधितांची संख्या सतत वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी होणार आहे. शाळा-महाविद्यालये बंद राहणार असली तरी ऑनलाईन अध्यापन मात्र सुरूच राहणार आहे.

पहिली ते नववी, अकरावी वर्ग आजपासून बंद
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षक, प्राध्यापक व मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. मोबाईल, इंटरनेट, यूट्यूबचा वापर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. सर्व शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घ्यावा, असे आदेशात म्हटले आहे. या नव्या आदेशामुळे पुन्हा एकदा शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.

पहिली ते नववी, अकरावी वर्ग आजपासून बंद
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

मंगल कार्यालयांसह अन्य व्यावसायिकांची चिंता वाढली

लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना उपस्थिती बंधनकारक केली आहे. नवे निर्बंध आल्याने अनेकांनी विवाह सोहळे स्थगित केले आहेत. तर काहींनी मंगल कार्यालयांकडे भरलेले डिपॉझीट परत मागण्यास सुरूवात केली आहे. तर काहींनी 'थांबा आणि पाहू'ची भूमिका घेतल्याने मंगल कार्यालय मालकांसह यावर चालणाऱ्या आचारी, बॅण्ड, मंडप, डेकोरेशन, पाणीजार, फर्निचर, हार-फुले, पार्लर अशा विविध व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. यापूर्वी असेच निर्बंध होते. पण ते काही दिवसांपूर्वी उठल्याने या व्यावसायिकांना बरे दिवस येऊ लागले होते. पण पुन्हा एकदा करोनाच्या नव्या व्हायरसने डोके वर काढल्याने सरकारने निर्बंध लादले आहेत. त्याचा फटका व्यावसायिकांना बसणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

पहिली ते नववी, अकरावी वर्ग आजपासून बंद
बॉलिवूड सेलिब्रिटी करोनाच्या विळख्यात!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com