COVID19 : देशात आज २.८ लाख नवे रुग्ण; चार हजारांहून अधिक मृत्यू

COVID19 : देशात आज २.८ लाख नवे रुग्ण; चार हजारांहून अधिक मृत्यू

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना गेल्या काही दिवसांपासून करोना रूग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे.

मात्र रुग्ण संख्येत घट होत असली तर करोना रुग्णांचा वाढते मृत्यू चिंताजनक आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पार गेली असून गेल्या २४ तासात चार हजाराहून अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ०८ हजार ९२१ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार १५७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ७१ लाख ५७ हजार ७९५ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ११ हजार ३८८ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात २ लाख ९५ हजार ९५५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ४३ लाख ५० हजार ८१६ वर पोहचली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com