Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकोव्हॅक्सीन, कोविशील्डला बाजारात विक्रीची परवानगी; पण मेडिकलमध्ये नाही तर 'या' ठिकाणी मिळणार

कोव्हॅक्सीन, कोविशील्डला बाजारात विक्रीची परवानगी; पण मेडिकलमध्ये नाही तर ‘या’ ठिकाणी मिळणार

दिल्ली | Delhi

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) भारतातील दोन महत्त्वाच्या कोविशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सीन (Covaxin) या करोना विरोधी लसींच्या बाजारातील विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. असं असलं तरी लस थेट मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार नाही.

- Advertisement -

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या करोनावरील लसींच्या विक्री औषध दुकानांवर म्हणजे मेडिकलवरून करता येणार नाही. तर खासगी हॉस्पिटल्स आणि क्लिनिकमधून लस घेता येईल आणि तिथेच ती दिला जाईल, अशी अट डीसीजीआयने घातली आहे.

तसेच खरेदी करण्यात येणाऱ्या लसींचा संपूर्ण डेटा संबंधित खरेदीदारांना डीसीजीआयकडे दर सहा महिन्यांनी सुपूर्द करावा लागणार आहे. संपूर्ण डेटा कोविन अॅपवर देखील अपडेट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या