Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआंतरराष्ट्रीय प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य; केंद्राने जारी केल्या नव्या मार्गदर्शक...

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य; केंद्राने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना

दिल्ली | Delhi

करोनाचा (covid19) वाढता प्रादुर्भाव पाहता वेळोवेळी कठोर पावले उचलली जात आहेत. त्याचसोबत करोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनमुळे (omicron) सुद्धा आता चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

अशातच केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या ( international arrivals india ) प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांना भारतात आल्यानंतर ७ दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसंच आठव्या दिवशी RT-PCR चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. केंद्राच्या या मार्गदर्शक सूचना ११ जानेवारीपासून लागू होणार आहेत. (Centre Revises Guidelines for International Arrivals from 11th January 2022)

तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आपला निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट अपलोड करावा लागेल. प्रवासाच्या ७२ तासांपूर्वीचा करोना चाचणी रिपोर्ट ग्राह्य धरला जाईल. एवढचं नव्हे तर रिपोर्ट बोगस आढळून आल्यास प्रवाशाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूदही आहे. यासाठी प्रवासापूर्वी एक फॉर्म भरणं आवश्यक आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून तिसरी (Covid Third Wave) लाट आल्याचंही म्हटलं जात आहे. देशात जवळपास सात महिन्यानंतर पुन्हा एकदा २४ तासात नव्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात १ लाख १७ हजार १०० इतके नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३० हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात ३०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढला असून तो ७.७४ टक्के इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या