Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशलसीकरणासाठी जाताय, तर CoWIN पोर्टलवरील हा बदल समजून घ्या...

लसीकरणासाठी जाताय, तर CoWIN पोर्टलवरील हा बदल समजून घ्या…

नवी दिल्ली :

लसीकरणाच्या मोहीमेला वेग आला आहे. परंतु कोविन (CoWin Portal) पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनेक लोकांना अडचणी येत आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी एक नवीन फिचर (CoWin Portal ) कोविन पोर्टवर उद्या ८ मे पासून कार्यन्वीत होणार आहे.

- Advertisement -

Corona vaccine : 18 + साठी आज दुपारी ४ वाजेपासून नोंदणी; जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन

कोविन नोंदणी केल्यानंतर लस न घेतल्यानंतरही प्रमाणपत्र (Vaccination Certificate) मिळत असल्याच्या तक्रारी काही जणांनी केल्या. यामुळे कोविन पोर्टवर नवीन फिचर जोडण्यात आले. यानुसार चार अंकी सुरक्षा कोड ८ मे पासून सुरू होणार आहे. यानुसार तुम्ही ठरलेल्या दिवशी लस घ्यायला गेलात की, तो ४ अंकी सुरक्षा कोड तुम्हाला विचारेल. त्यानंतर तो पोर्टलमध्ये अपडेट केला जाईल. कोड अपडेट केल्यानंतर तुम्ही लस घेतल्याची पुष्टी केली जाईल.

या कागदपत्रांची गरज

लसीकरणादरम्यान, अपॉइंटमेंट स्लिप दाखवणे गरजेचे असेल. त्यावर ४ अंकी सुरक्षा कोड असेल. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर संदेश येईल की, तुम्ही यशस्वीरित्या लस घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या