नाशिक उद्यापासून मिशन ‘कवच-कुंडल’ मोहिमेवर; वाचा सविस्तर

नाशिक उद्यापासून मिशन ‘कवच-कुंडल’ मोहिमेवर; वाचा सविस्तर
Corona

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील करोनाची तिसरी लाट (Covid 3rd Phase) थोपविण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के (100 percent vaccination) होण्याच्या दृष्टिकोनातून उद्यापासून ( दि ८) जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण (Rural and urban area) मिशन ‘कवच-कुंडल’ )Mission Kavach kundal Campaign) मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नागरीकांनी सहभागी होवून लसीकरण करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ (Guardien minister chhagan bhujbal) यांनी केले....

नाशिक जिल्ह्यामध्ये (Nashik District) ८ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव महानगर पालिकेसह (Malegaon Municipal Corporation) सर्व शहरी, ग्रामीण भागातील गाव, पाडे अंतर्गत कोविड लसीकरण मोहीम (Covid Vaccination Campaign) ही आता मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे पहिला डोस व दुसरा डोस घेऊन १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.

तिसरी लाट थोपविणे कामी लसीकरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, यांच्या सहकार्याने वरील कालावधीमध्ये सर्व गावांमध्ये तीन दिवस आधी पूर्व सूचना दवंडी व लाऊड स्पीकर वरून माहिती देण्यात येणार आहे, त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या लसीकरणाचे नियोजन सोयीनुसार करता येईल. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना पहिला व दुसरी डोस देऊन त्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण व्हावे हे उद्दिष्ट ठेवून अत्यंत सूक्ष्म नियोजन जिल्हा प्रशासन करण्यातआले असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

या मोहिमेत सर्व गावांमध्ये लसीकरण पूर्वी चांगल्या प्रकारे जनजागृती करण्यात येणार असून यामध्ये भिंतीवर म्हणी लिहून तसेच प्रत्येक गावात विद्यार्थ्यांमार्फत कोरोना नियमावलीचे पालन करून रॅलीचे आयोजन तसेच लाऊडस्पीकरवरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्याला राज्यस्तरावरून चांगल्या प्रकारे लस पुरवठा होत असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, गावातील सर्व लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे तसेच लसीकरणाचे नियोजन गावातील लोकांच्या कामाच्या सोयीने व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र ५९२ आरोग्य उपकेंद्र, सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालय, महापालिकेचे नागरी आरोग्य केंद्र तसेच कटक मंडळ दवाखाने यांचेमार्फत या कवच-कुंडल मोहिमेचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

तसेच ज्या ठिकाणी मजूर वसाहती आहेत त्या ठिकाणी मजुरांच्या कामाच्या वेळेच्या सोयीनुसार लसीकरण सत्र घेण्यात येणार आहेत. गाव पातळीवरील प्रत्येक आशा आरोग्य सेवक, सेविका लाभार्थ्यांच्या याद्या तयार करत असून कोरोना लसीकरणपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही यासाठी आशा ,अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील ग्रामपंचायत व पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था, बिगर शासकिय संस्था यांची मदत घेण्यात येणार असून यासाठी हे विशेष प्रयत्न केले जात आहेत.

कवच-कुंडल साठी प्रशासकीय यंत्रणा मिशन मोडवर

नवरात्रोत्सवात कवच-कुंडल मोहीमेच्या अंमल बजावणीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा मिशन मोडवर काम करत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले असून ते म्हणाले, महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी हे या मोहिमेचे संनियंत्रण करणार असून सर्व नागरिकांनी या कालावधीत लसीकरणाच्या मिशन कवच-कुंडल मोहीमेत सहभागी होवून आपल्या घरातील, आपल्या परिसरातील सर्वांचे लसीकरण करून शासनाच्या मोहिमेला व प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे. तसेच कोरोना साथीची तिसरी लाट आली तरी तिची तीव्रता कमी कशी राहील यासाठी शासन-प्रशासन लसीकरणाचे महत्त्व ओळखून मनापासून प्रयत्न करत असून नाशिक जिल्ह्यात या तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल तर १८ वर्षे पुढील सर्व वयोगटांचे दुसऱ्या डोससह १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com