Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशलसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार पंतप्रधान मोदींचा फोटो, कारण…

लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार पंतप्रधान मोदींचा फोटो, कारण…

दिल्ली | Delhi

करोनापासून संरक्षणासाठी केंद्र सरकारने मोहिम हाती घेत लसीकरण प्रक्रिया गतीने राबवली. मात्र, लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र आता काही राज्यात लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो प्रमाणपत्रावर दिसणार नाही.

- Advertisement -

देशातील ५ राज्यांमध्ये निवडणूका जाहिर झाल्यानंतर त्याठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सावध झालंय. गेल्या वेळच्या निवडणुकांवेळी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरुन झालेला गोंधळ टाळण्यासाठी सरकारने आता तात्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यानुसार निवडणूक होत असलेल्या ५ राज्यांमधील कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवला जाणार आहे.

दरम्यान शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती. या घोषणेनुसार उत्तर प्रदेशात सात टप्प्यात पंजाब, उत्तराखंड, गोवा मध्ये एका तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या