Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशआजपासून १८ वर्षांवरील सर्वांना 'बुस्टर डोस', कोण असेल पात्र? पैसे किती लागतील?...

आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना ‘बुस्टर डोस’, कोण असेल पात्र? पैसे किती लागतील? वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

देशात करोना (COVID19) आटोक्यात येत असताना आता केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) करोना लसीकरणाबाबत (corona vaccination) मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

आजपासून (१० एप्रिल) १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व लोकांना करोना लसीचा बुस्टर डोस (Precaution Dose) देण्यात येणार आहे. करोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेदरम्यान केंद्राकडून उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. (Covid-19 precaution dose for 18+ age group)

१८ ते ५९ वर्षांच्या नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर सशुल्क बूस्टर डोस घेता येणार आहे. याआधी लोकांना करोनाचे दोन डोस दिले जात होते तर करोनाचा बुस्टर डोस हा फक्त व्याधी ग्रस्त, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सनाच दिला जात होता. सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा होती. ती आता संपली आहे.

दरम्यान काल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या उत्पादकांनी कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या लसीचे दर खासगी रुग्णालयांसाठी २२५ रुपयांपर्यंत कमी केले आहेत. सध्या खासगी रुग्णालयांसाठी कोविशिल्डचे दर ६०० रुपये तर कोवॅक्सिनचे दर १२०० रुपये होते.

बुस्टर डोस कधी घेता येईल?

ज्या व्यक्तींनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन ९ महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या