या कोरोना सेंटरमध्ये गाईचे दूध, तूप, दही व गोमूत्रापासून उपचार


या कोरोना सेंटरमध्ये गाईचे दूध, तूप, दही व गोमूत्रापासून उपचार

अहमदाबाद

कोरोनाचा प्रसार व धोका कमी होत नसल्याने जग‌भरात कोरोना रोखण्यासाठी संशोधन होत आहे. गुजरातमध्ये असेच वेगळे संशोधन केले जात आहे. बनासकांठा जिल्ह्यातील तेतोडा गावात पाच हजार गाई असलेली गोशाळा आहे. या गोशाळेचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले. येथील रुग्णांवर गाईचे दूध, तूप, दही व गोमूत्रापासून बनवण्यात आलेल्या औषधांच्या मदतीने उपचार केले जात आहेत.

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील तेतोडा गावात आहे. या गावात ‘वेदालक्षण पंचगव्य आयुर्वेद कोविड आयसोलेशन सेंटर’ कोरोना रुग्णांसाठी सुरु केले आहे. या सेंटरमध्ये १०० जणांवर उपचार करता येणार आहे. त्यासाठी दोन एमबीबीएस डॉक्टर व परिचारकांची नेमणूक करण्यात आली. ५ मे रोजी हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून पहिल्या दोन दिवसांत ३० रुग्ण दाखल झाले. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात.

कोविड सेंटरविषयी बोलताना बनासकांठाचे जिल्हाधिकारी आनंद पटेल म्हणाले की, जिल्हाधिकारी आनंद पटेल म्हणाले की, कोरोना सेंटरमध्ये दोन पद्धतीने उपचार केले जात आहे. ५० बेड आयुर्वेद पद्धतीने उपचार करण्यासाठी तर ५० बेड अॅलेपॅथी पद्धतीने उपचार करण्यासाठी आहे. ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या विलिगिकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात सहा हजार बेड करण्यात येणार आहे. त्यांना कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. तसेच रुग्णांनाही वेदालक्षण पंचगव्य आयुर्वेद पद्धतीने किंवा अॅलेपॅथी पद्धतीने उपचार या पैकी काही निवड करण्याचे स्वातंत्र आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com