Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशCorona vaccine ची प्रतीक्षा संपली : या तारखेपासून लसीकरण मोहीम

Corona vaccine ची प्रतीक्षा संपली : या तारखेपासून लसीकरण मोहीम

नवी दिल्ली

कोरोनाच्या दोन लसी आल्यानंतर लसीकरण कधी सुुरु होणार त्याची प्रतीक्षा प्रत्येकाला होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाची तारीख जाहीर केली आहे. १३ किंवा १४ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.

- Advertisement -

देशातील कोरोना लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाची तारीख सांगितली. लसीला आपातकालीन मंजुरी मिळाल्यानंतर दहा दिवसात कोरोना लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार आहे. ३ जानेवारीला कोव्हिशील्ड व कोव्हॉक्सीन या दोन लसींना मंजुरी मिळाली होती. यामुळे १३ किंवा १४ जानेवारीला कोरोना लशीचा (covid 19 vaccine) पहिला डोस दिला जाणार आहे, लसीकरणाची मोहीम चालवण्यासाठी चार मोठी केंद्र आहेत. हवाई मार्गाने लसीची वाहतूक केली जाणार आहे. असे त्यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या