Corona vaccine : 18 + साठी आज दुपारी ४ वाजेपासून नोंदणी; जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन

co win
co win co win

नवी दिल्ली

देशभरात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी कोरोना लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया आज दुपारी ४ वाजेपासून सुरु होत आहे. कोरोना लस कशी बुक करावी? मोबाइल किंवा ऍपवर कशी नोंदणी करावी? जाणून घ्या तुम्हाला आवश्यक असणारी सर्व माहिती.

co win
नगरमध्ये ऑक्सिजन अभावी 7 रुग्णांचा मृत्यू : पोलिसांकडून चौकशी सुरू

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी सरकारच्या को-डब्ल्यूआयएन पोर्टलवर ( Co-WIN) आणि cowin.gov.in तसेच Aarogya Setu App पर नोंदणी करु शकता.बुधवारी सायंकाळी ४ वाजता सुरू होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असेल. नोंदणीसाठी आधार क्रमांक (किंवा तत्सम ओळखपत्र), मोबाईल क्रमांक लागणार आहे.

co win
चांगली बातमी : महाराष्ट्रात विक्रमी दीड कोटी लसीकरण

अशी असेल प्रक्रिया ?

१) कोविन प्लॅटफॉर्मवर (CoWIN) आणि आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी सुरु होईल.

२)कोविन पोर्टलवर जा (www.cowin.gov.in) त्याठिकाणी तुम्ही ओटीपीसाठी आपला मोबाइल नंबर द्यावा लागले.

३) नोंदणीचा अर्ज समोर दिसेल. त्यात नाव, जन्मवर्ष, आधार क्रमांक आदी माहिती भरा.

४) लसीकरणासाठी आपल्या जवळचे केंद्र किंवा आपणास हवे असेल ते केंद्र (पिनकोड किंवा जिल्ह्याचे नाव टाकून) निवडा.

४) आपल्या एका क्रमांकावर स्वत:सह चार जणांची नोंदणी करु शकतो.

५) नोंदणी पुर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईल क्रमांकावर संदेश येतो.

ऍपवर अशी करा नोंदणी

आरोग्य सेतु अ‍ॅपवर तुम्हाला कोविन डॅशबोर्ड देखील दिसेल. तिथे क्लिक केल्यानंतर लॉगिन / रजिस्टरवर टॅप करावे लागेल. मग आपल्याला आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल. ज्यावर ओटीपी येईल, त्यात प्रवेश करून तुमचा मोबाइल नंबर पडताळला जाईल. यानंतर, तुम्हाला आधार कार्ड, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या फोटो आयडी कार्डांपैकी एक पर्याय निवडावा लागेल. नाव, जन्मतारीख यासारखी माहिती द्यावी लागेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com