Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशात एकूण रुग्णसंख्या ८७ लाखांच्यावर, जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती

Covid-19 : देशात एकूण रुग्णसंख्या ८७ लाखांच्यावर, जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती

दिल्ली l Delhi

देशात करोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला होता.मात्र करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात ४४ हजारांच्यावर रुग्ण आढळले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात ५४७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ४४ हजार ८७९ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ८७ लाख २८ हजार ७९५ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ८१ लाख १५ हजार ५८० रूग्ण करोनामुक्त झाले असून ४ लाख ८४ हजार ५४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख २८ हजार ६६८ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यात मागील २४ तासात ४ हजार ४९६ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १७ लाख ३६ हजार ३२९ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ७ हजार ८०९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १६ लाख ०५ हजार ०६४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८५ हजार ५८३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४५ हजार ६८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील स्थिती

जगभरात गेल्या २४ तासांत ६ लाख ३८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ९ हजार ५९३ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. जगात आतापर्यंत ५ कोटी ३० लाख ६९ हजार करोनाबाधितांची नोंद केली गेली आहे. तर आतापर्यंत १२ लाख ९८ हजार ४९३ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे या महामारीतून ३ कोटी ७१ लाख लोक बरे झाले आहेत. सध्या १ कोटी ४५ ​​लाख रूग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ९५ हजार लोकांची प्रकृती गंभीर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या